विधानसभेत मनसेला आघाडीत घेण्याबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य

विधानसभेत मनसेला आघाडीत घेण्याबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य

शरद पवार यांनी मनसेसोबत आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडी करण्याबाबतही भाष्य केलं आहेत.

  • Share this:

कोल्हापूर, 13 एप्रिल : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावेळी शरद पवार यांनी मनसेसोबत आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडी करण्याबाबतही भाष्य केलं आहेत.

'या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा एककलमी कार्यक्रम आहे. मोदी-शहा जोडी देशाला घातक आहे, हे त्यांना सांगायचं आहे. त्यांनी ही निवडणूक लढवली नाही. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांचे उमेदवार असतील. चुकीच्या लोकांच्या हातून राज्य काढून घेण्यासाठी उद्याच्या काळात चर्चा होऊ शकते,' असं म्हणत शरद पवार यांनी मनसेबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे.

मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल

- बोफर्सवेळी jpc ची मागणी केली ती मान्य केली पण राफेलप्रकरणी का मान्य होत नाही?

- राफेलची संसदेत माहिती दिली जात नाही, मात्र वृत्तपत्रात मात्र ती छापून येते

- वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर पण गदा आणली जात आहे

- मोदी फसगत करत आहेत

- त्यांनी काहीच केलं नाही, म्हणून दुसरा विषय काढून लक्ष वळवलं जातंय

- मेहबुबा cm असताना भाजप सत्तेत सहभागी होते

- त्याच पक्षाचे नेते आता माझ्याकडून उत्तर मागत आहेत

- मोदी आपला दोष इतरांवर ढकलत आहेत

- दिलेली आश्वासने न पाळल्याने लोकांमध्ये नाराजी आहे

SPECIAL REPORT: कुणामुळे टळला राधाकृष्ण विखेंचा भाजप प्रवेश?

First published: April 13, 2019, 9:54 AM IST

ताज्या बातम्या