मोदींकडून थेट कुटुंबावर टीका, आता शरद पवारांनी केला शाब्दिक हल्ला

मोदींकडून थेट कुटुंबावर टीका, आता शरद पवारांनी केला शाब्दिक हल्ला

'महाराष्ट्रात येऊन मोदी सांगतात की, पवारांच्या घरात भांडण आहे. आरं बाबा तुझ्या घरात हाय का काय?'

  • Share this:

अहमदनगर, 5 एप्रिल : ' मोदींनी आजपर्यंत गांधी घराण्यावर टीका केली. आज काल महाराष्ट्रात माझ्यावर टीका करत आहेत. देशाचा पंतप्रधान येऊन एकाच माणसावर टीका करतो, म्हणजे हा काय साधा-सुधा माणूस आहे काय,' असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पलटवार केला आहे.

'महाराष्ट्रात येऊन मोदी सांगतात की, पवारांच्या घरात भांडण आहे. आरं बाबा तुझ्या घरात हाय का काय? तुम्हाला तुमचं घर सांभाळता आलं नाही आणि आमच्यावर बोलताय,' असं म्हणत शरद पवार यांनी मोदींनी पवार कुटुंबातील गृहकलहावर केलेल्या टीकाला उत्तर दिलं आहे.

'महाराष्ट्र आल्यावर माझ्यावर टीका करताय. हा महाराष्ट्र शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज यांचा आहे. वेळप्रसंगी छातीचा कोट करून कुठलीही किंमत मोजायला तयार असतो. त्यामुळे अशा लुंग्या सुनग्यांनी कितीही टीका केली तरी फरक पडणार नाही,' असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला आहे.

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवारी संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी शेवगाव इथं सभा घेतली. या सभेत स्थानिक मुद्द्यांसह राष्ट्रीय मुद्द्यांवर बोलत शरद पवार यांनी चौफेर फटकेबाजी केली.

काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील महायुतीच्या प्रचाराचा नारळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी वर्धा येथील सभेत फोडला. मोदींनी त्यांच्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेस नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. शरद पवार कोणताही निर्णय विचार करुन घेतात. त्यांना कळते देशाची हवा कोणाच्या बाजूने आहे. म्हणून पवारांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्याच बरोबर पवारांच्या कुटंबात सध्या लढाई सुरु आहे. खुद्द त्यांच्या पुतण्याकडून पक्षावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न सुरु असल्याने कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची आणि कोठून नाही हे त्यांना कळत नाही, असा टोला ही मोदींनी लगावला.

VIDEO : 2014 मध्ये बारामती का जिंकता आली नाही? मुख्यमंत्र्यांनी दिलं 'हे' कारण

First published: April 5, 2019, 4:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading