पवारांच्या दुष्काळ दौऱ्यात रोहित यांची चर्चा, राजकारणातील लाँचिंगबद्दल म्हणाले...

पवारांच्या दुष्काळ दौऱ्यात रोहित यांची चर्चा, राजकारणातील लाँचिंगबद्दल म्हणाले...

राजकीय एण्ट्रीबाबत याआधीही रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे.

  • Share this:

अहमदनगर, 13 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या महाराष्ट्रभर फिरून दुष्काळाची पाहणी करत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत नातू रोहित पवार हेदेखील दिसत आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात रोहित यांचं हे लाँचिंग आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

राजकीय एण्ट्रीबाबत याआधीही रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे. आता राज्याच्या राजकारणातील लाँचिंगविषयी त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, 'हा राजकीय दौरा नसून दुष्काळ पाहणी दौरा आहे. यातून आम्ही लोकांच्या अडचणी समजून घेत आहोत. मी आताही जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत आहे. त्यामुळे हे काही माझं राजकीय लाँचिंग नाही.' याबाबत एका मराठी वाहिनीने वृत्त दिलं आहे.

दरम्यान, रोहित पवार विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. कारण काही दिवसांपूर्वी खुद्द रोहित पवार यांनी त्याबद्दल खुलासा केला आहे. 'माझा विधानसभा निवडणूक लढवण्याचा विचार आहे. पण, मतदारसंघ मात्र वरिष्ठ ठरवतील,' असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे रोहित पवार आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. सध्या रोहित पवार हे पुणे जिल्हा परिषद सदस्य आहेत. मागील काही दिवसांपासून रोहित पवार हे सतत चर्चेत आहेत.

पवारांचा दुष्काळ दौरा

लोकसभा निवडणूक संपताच शरद पवार यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यात पवार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीत दुष्काळ आणि शेतकऱ्यांचे इतर प्रश्न हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. त्यामुळे या मुद्द्यारून सरकारला लक्ष्य करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असणार आहे. दुष्काळाच्या प्रश्नावरून राज्यातील फडणवीस सरकारला अडचणीत आणण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी मोर्चेबांधणी करताना दिसत आहे.

VIDEO: ...तर मीच सरकारला बघून घेता - शरद पवार

First published: May 13, 2019, 11:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading