राष्ट्रवादीच्या मेळाव्यात पैशांबाबत शरद पवारांचा भाजप कार्यकर्त्यांसाठी 'स्पेशल मंत्र'

राष्ट्रवादीच्या मेळाव्यात पैशांबाबत शरद पवारांचा भाजप कार्यकर्त्यांसाठी 'स्पेशल मंत्र'

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित पुण्यातील कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

  • Share this:

पुणे, 6 एप्रिल : 'मी आठ जिल्ह्यात जाऊन आलो. आधी वाटत होतं निवडणूक अवघड आहे, पण आता 8 जिल्ह्याच्या दौऱ्यानंतर यश आपलंच याची खात्री झालीय. विरोधकांकडे सांगण्यासारखं काहीच नाही. फक्त पैसे आहेत. तुम्ही त्यावर लक्ष ठेवा. भाजपच्या कार्यकर्त्यांना खाजगीत सांगा, परत पैसे मिळतील की नाही माहीत नाही, उगाच आता मिळालेले खर्च करू नका,' असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यातील कार्यकर्ता मेळाव्यात भाजपच्या कार्यकर्त्यांना तिरकस भाषेत सल्ला दिला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित पुण्यातील कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. 'निवडणुकीआधी पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना विश्वास दिला होता पिकाला हमीभाव देऊ, पण गेल्या दोन वर्षात 11 हजार शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. हे उगाच आत्महत्या करत असतील का? याचं कारण शेतकऱ्याला दिलेला शब्द सरकारने पाळला नाही,' असं म्हणत शेतकरी प्रश्नावरून पवारांनी नरेंद्र मोदींवर शाब्दिक हल्ला चढवला.

शरद पवार यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

कार्यकर्त्यांनो जोमाने काम करा. पुणे जिल्ह्यातल्या चारही जागा आपण जिंकणार यात शंका नाही

पुण्याची निवडणूक नेहमीप्रमाणे चर्चेत, कारण देशाला दिशा देणारा हा मतदारसंघ

मला विचारलं की मी लोकांना सांगतो पुण्यातून काँग्रेसचा खासदार लोकसभेत जाणार

लोकांनी भाजपला विश्वासाने 300 जागा निवडून दिल्या आणि मोदींना पंतप्रधान केलं. आधी ते फक्त एकच गोष्ट सांगत राहिले, विकासाचं मॉडेल. लोकांना वाटलं ते देशात राबवतील.

हे मॉडेल यशस्वी होण्यासाठी सगळ्यांना सोबत घेण्याची गरज असते ती जबाबदारी भाजप नेतृत्वाने पाळली नाही

देशात 600 पेक्षा जास्त असे हल्ले झाले होते

त्यांनी अनेक गोष्टींचा विश्वास दिला होता त्याची पूर्तता झाली नाही

नेते प्रचाराला अन् गावकरी पाण्याला; हिंगोली जिल्ह्याचा SPECIAL REPORT

First published: April 6, 2019, 6:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading