Home /News /maharashtra /

माढा : मोहिते पाटलांच्या ओठांवर अजूनही 'घड्याळ', भाजपच्या प्रचारसभेत रणजितसिंहाकडून उल्लेख

माढा : मोहिते पाटलांच्या ओठांवर अजूनही 'घड्याळ', भाजपच्या प्रचारसभेत रणजितसिंहाकडून उल्लेख

सांगोला इथं माढा मतदारसंघातील भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.

    माढा, 14 एप्रिल : नुकताच भाजप प्रवेश केलेल्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सांगोला येथील प्रचारसभेत घड्याळाला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी सोडल्यानंतरही रणजितसिंहांच्या ओठांवर अजूनही घड्याळच असल्याचं पाहायला मिळालं. आपण विरोधी उमेदवाराच्या चिन्हाचा उल्लेख केल्याचं लक्षात येताच रणजितसिंह यांनाही हसू आवरता आलं नाही. सांगोला इथं माढा मतदारसंघातील भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याकडून एक चूक झाली आणि उपस्थितांमध्ये मोठा हशा पिकला. या प्रचारसभेत बोलताना रणजिसिंह म्हणाले की, 'जे आपल्या भविष्याच्या बाजूने उभे राहिले आहेत, त्यांच्या बाजूने आपल्याला उभं राहिला हवं. 23 तारखेला आपलं घड्याळ आहे.' दरम्यान, ही चूक लक्षात आल्यानंतर स्वत: रणजितसिंह मोहिते पाटील आणि सभेला उपस्थित लोकही हसू लागले. माढ्यात राष्ट्रवादी Vs भाजप रणजितसिंह मोहिते पाटलांना भाजपमध्ये घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी खेळी खेळत संजय शिंदे यांना आपल्याकडे खेचले आणि उमेदवारी दिली. शरद पवार यांच्या या खेळीमुळे भाजपसमोर उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. या पार्श्वभूमीवर माढ्यात आता जोरदार लढत होण्याची शक्यता आहे. VIDEO :...म्हणून पार्थला दिल्लीत पाठवा, अजित पवारांचा तरुणांना मिश्किल सल्ला
    First published:

    पुढील बातम्या