मुंबई, 18 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला देशभरात सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे, पुढील टप्प्यातील उमेदवारांसाठी प्रत्येक पक्षातील हायप्रोफाईल नेते मैदानात उतरल्याचं चित्र आहे. आजही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा होणार आहेत.
राज्याच्या विविध भागात सर्वच पक्षातील दिग्गज नेत्यांच्या सभा होणार आहेत. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप अध्यक्ष अमित शहा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांसारख्या नेत्यांचा समावेश आहे.
कुणाची किती वाजता सभा?
- पेणमधे दु. 12 वा. मुख्यमंत्र्याची सभा
- अलीबागमधे शरद पवारांची संध्याकाळी सभा
- उद्धव ठाकरेंची कणकवलीत सभा
- राज ठाकरे यांची पुण्यात संध्याकाळी सभा
- अमित शहा यांची जालन्यात संध्याकाळी 4 वा. सभा
- छगन भुजबळ दुपारी 12 वाजता मालेगाव इथं सभा
- कोपरगावमधे आदित्य ठाकरे यांची संध्याकाळी 5 वा. सभा
- इंदापूरमध्ये अजित पवार यांची सकाळी 10 वाजता सभा
- भुसावळ इथं प्रकाश आंबेडकर यांची 5 वाजता सभा होणार
VIDEO : पुलवामा हल्ल्याप्रकरणी राज ठाकरेंचा गंभीर आरोप