'स्वाभिमानी'च्या राजू शेट्टींविरोधात राजू शेट्टीच उतरले मैदानात

'स्वाभिमानी'च्या राजू शेट्टींविरोधात राजू शेट्टीच उतरले मैदानात

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विद्यमान खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात दुसरे एक राजू शेट्टी मैदानात असणार आहेत.

  • Share this:

हातकणंगले, 5 एप्रिल : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात एकूण 23 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या गमतीशीर बाब म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विद्यमान खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात दुसरे एक राजू शेट्टी मैदानात असणार आहेत.

हातकणंगलेमधून बहुजन महापार्टीच्या राजू शेट्टी यांनी अर्ज भरल्याने कोल्हापुरात हा चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. या मतदारसंघात महायुती आणि महाआघाडीत मुख्य लढत होणार असल्याचे दिसत आहे. त्यांच्या उमेदवारांनी यापूर्वीच उमेदवारी अर्ज भरले आहेत. आता छाननी, माघार या प्रक्रियेकडे लक्ष लागले असून 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

हातकणंगले आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी

हातकणंगले हा मतदारसंघ मुख्यत: ऊसपट्टा आणि कारखानदारीचा भाग म्हणून ओळखला जातो. राजू शेट्टी यांनी या पट्ट्यावर आपल्या सततच्या आंदोलनांतून आणि सक्रिय राजकारणातून चांगलंच वर्चस्व निर्माण केलं आहे. म्हणजे या मतदारसंघामध्ये येणाऱ्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थात शिवसेना-भाजप ताकदवान असतानाही लोकसभा निवडणुकीत बाजी मारण्यात मात्र राजू शेट्टी यशस्वी ठरतात.

या मतदारसंघाच्या अंतर्गत येणारे विधानसभा मतदारसंघ

शाहूवाडी

हातकणंगले

इचलकरंजी

शिरोळ

इस्लामपूर

शिराळा

काय आहे सध्याची राजकीय स्थिती?

नाही नाही म्हणता आता शिवसेना-भाजपची युती झाली आहे. हा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेकडे गेला आहे. शिवसेनेने राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांचे सुपुत्र धैर्यशील माने यांनी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळेल.

VIDEO : आढळराव पाटील आणि गिरीश बापटांच्या भेटीबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...

First published: April 5, 2019, 8:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading