मुंबई, 25 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झालं आहे. आता राजकीय पक्षांनी चौथ्या आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्याकडे लक्ष केंद्रित केलं आहे. मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी प्रत्येक पक्षातील हायप्रोफाईल नेते मैदानात उतरल्याचं चित्र आहे. आजही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा होणार आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नेते आपल्या पक्षातील उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात असतील.
कुणाची किती वाजता सभा?
शरद पवार यांची सकाऴी 10 वाजता तळेगाव इथं होणार सभा
मुख्यमंत्र्यांची शिरपूर इथं सकाळी 10 वाजता सभा
वंचित आघाडी सभा मनमाड – दुपारी 12 वाजता
आदित्य ठाकरे यांची सभा डहाणू – दुपारी 2 वाजता
मुख्यमंत्र्यांची सभा भिवंडी - 4.30 वाजता
मुख्यमंत्री सभा पिंपळनेर - संधयाकाळी 5 वाजता
उद्धव ठाकरे चाकण सभा – 5 वाजता
जुन्नर –शरद पवार सभा मंचर - 5
मुख्यमंत्री सभा भिवंडी - 6 वाजता
मुख्यमंत्री सभा डोंबिवली - 6 वाजता
अशोक चव्हाण आणि माणिकराव ठाकरे सभा – श्रीरामपूर – संध्याकाळी 6 वाजता
उद्धव ठाकरे पिंपरी सभा – 8 वाजता
बच्चू कडू यांची सभा - नाशिक
राज ठाकरे यांची पनवेलमध्ये संध्याकाळी 6.30 वाजता होणार जाहीर सभा
SPECIAL REPORT : मोदींच्या अराजकीय मुलाखतीचा राजकीय अर्थ काय?