मुंबई, 24 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी पूर्ण झालं आहे. आता पुढील टप्प्यातील उमेदवारांसाठी प्रत्येक पक्षातील हायप्रोफाईल नेते मैदानात उतरल्याचं चित्र आहे. आजही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा होणार आहेत.
राज्याच्या विविध भागात सर्वच पक्षातील दिग्गज नेत्यांच्या सभा होणार आहेत. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांसारख्या नेत्यांचा समावेश आहे.
कुणाची कुठे होणार सभा?
मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची काळाचौकी इथं सभा
मुख्यमंत्र्यांची नाशिक, कुर्ला, घाटकोपरमध्येही होणार सभा
पंकजा मुंडे नेवासा इथं करणार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची धुळ्यात होणार सभा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सायंकाळी मुलुंड इथं सभा
शरद पवार आणि छगन भुजबळ यांची नाशिकच्या कोपरगाव इथं सभा
वंचित बहुजन आघाडीची अंबरनाथमध्ये सभा
राजनाथ सिंह यांची मीरा रोड इथं होणार सभा
शरद पवार यांची नाशिक गिरनारेमध्ये प्रचारसभा
VIDEO : राज यांचा मुंबईतील सभेत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, म्हणाले...