राहुल गांधींच्या सभेमुळे विखे पाटलांसाठी काँग्रेसकडून स्पष्ट संकेत? जिल्ह्यात जोरदार चर्चा

राहुल गांधींच्या सभेमुळे विखे पाटलांसाठी काँग्रेसकडून स्पष्ट संकेत? जिल्ह्यात जोरदार चर्चा

राधाकृष्ण विखे यांना शह देत बाळासाहेब थोरात यांना ताकद देण्याचे प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाकडून सुरू झाले आहेत का, अशी चर्चा रंगत आहे.

  • Share this:

शिर्डी, 25 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे शिर्डी लोकसभा मतदारसंघात सभा घेणार आहेत. पण राहुल गांधी यांची ही सभा संगमनेरमध्ये होणार आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे यांना शह देत बाळासाहेब थोरात यांना ताकद देण्याचे प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाकडून सुरू झाले आहेत का, अशी चर्चा रंगत आहे.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डीऐवजी त्यांचे अंतर्गत विरोधक मानले जाणाऱ्या बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर इथं राहुल गांधींची सभा होत आहे. यातून काँग्रेस भविष्यातील संकेत देत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, नुकतीच राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.राधाकृष्ण विखेंना बाजूला सारून नेते होण्याची बाळासाहेब थोरातांची धडपड सुरु आहे. काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला गेलाय, अशा शब्दात विखे पाटलांनी घणाघाती टीका केली. पक्षात असतानाही शिर्डी लोकसभेत पक्षाच्या बॅनरवरून वगळले. आता विखेंशिवाय पर्याय नाही, म्हणून पुन्हा माझा फोटो लावलाय, असंही विखे पाटलांनी यावेळी सांगितले.

श्रीरामपूर येथे बुधवारी नाराज झालेले काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत मेळावा झाला. करण ससाणे यांच्या समर्थकांनी विखें पाटील यांना पाठिंबा दिला. या मेळाव्यात काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना पाडण्यासाठी रणनीती आखण्यात आली. राधाकृष्ण विखे पाटील जे आदेश देतील त्यानुसार काम करणार असल्याचे ससाणे समर्थकांनी सांगितले.

करण ससाणे यांची बाबासाहेब थोरातांनी जिल्हाध्यक्षपदी वर्णी लावली होती. मात्र, जयंत ससाणेंची ऐनवेळी साथ सोडणाऱ्या भाऊसाहेब कांबळेंना मदत न करण्याची ससाणे समर्थकांची भूमीका घेतली आहे.

VIDEO: NCP नगरसेविकेच्या पतीवर कुऱ्हाड, तलवारीनं सपासप वार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 25, 2019 10:37 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading