विखे पाटलांचा राज्यातील नेत्यांवर निशाणा, काँग्रेस सोडण्याबाबत काय म्हणाले?

विखे पाटलांचा राज्यातील नेत्यांवर निशाणा, काँग्रेस सोडण्याबाबत काय म्हणाले?

राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमधून बाहेर पडून भाजप किंवा शिवसेनेत दाखल होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.

  • Share this:

अहमदनगर, 27 एप्रिल : काँग्रेसचे नाराज नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत स्वपक्षातील नेत्यांवर निशाणा साधला आहे. पण विरोधी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस पक्षातूनही बाहेर पडण्याबाबत मात्र विखे पाटील यांनी आताच भाष्य करण्यास नकार दिला आहे.

राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमधून बाहेर पडून भाजप किंवा शिवसेनेत दाखल होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण निवडणूक झाल्यानंतर आपण कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय जाहीर करू, अशी भूमिका विखे पाटलांनी घेतली आहे.

विखे पाटलांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

पवारांच वडीलांबद्दलच वक्तव्य मनाला वेदना देणारं

काँग्रेसला नगरची जागा सोडण्यासाठी माझा आग्रह होता ... मात्र राष्ट्रवादीच्या चिन्हावर नाही

राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढा, असं म्हणणं माझ्यासाठी धक्कादायक

काँग्रेस पक्षाने ही जागा घ्यायला हवी होती

पवारांच्या वक्तव्यामुळे सुजयने भाजपात जाण्याचा तात्काळ निर्णय घेतला

मी राजीनामा द्यायला तयार असल्याचं पत्र पक्षश्रेष्ठींना पाठवलं

वडीलांचा एवढा मोठा अवमान झाल्यानं आघाडीच्या प्रचारापासून अलिप्त...

आम्ही राजकीय आत्महत्याच करावी अशी सगळ्यांची भूमिका

नगरची लढाई पवार विरूद्ध विखे अशी रंगवली गेली

व्यक्तिगत पातळीवर निवडणूक आल्यानं मला मुलामागे उभं रहावं लागलं

काँग्रेसने राजीनामा स्वीकारला

मुलाला पक्षाने जागा मिळवून दिली नाही म्हणून पक्षावर नाराज असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांना अखेर काँग्रेसने पक्षाने विरोधी पक्षनेतेपदातून मुक्त केलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राहुल गांधी यांनी विखे पाटलांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा स्वीकारला आहे, अशी माहिती दिली.

अहमदनगरचे मतदान पार पडल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात दाखल झाले. गावो-गावी ते समर्थकांच्या बैठका घेत आहेत. विखे पाटील हाच आमचा पक्ष असून ते जो आदेश देतील त्यानुसार काम करण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली.

विखेंच्या गोटातील भाऊसाहेब कांबळे यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आणि बाळासाहेब थोरात यांनी त्यांना निवडून आणण्यासाठी विखे विरोधकांची मोट बांधली. एकमेकांचे राजकीय विरोधक असलेल्या विखे थोरात यांची भूमिका या मतदारसंघात महत्त्वाची ठरणार आहे.

विखेंची शिर्डीकडे कूच

सुजय विखेंच्या भाजपप्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यात कोणत्याही काँग्रेसच्या सभेला हजेरी लावली नाही. राधाकृष्ण विखे दक्षिण नगरमध्ये मुलाच्या विजयासाठी मोट बांधत होते. आता नगरच्या मतदानानंतर सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी लोकसभा मतदारसंघात दाखल झाले.

VIDEO : मोदींची मुंबईतील सभा, भाषण सुरू असतानाच अनेक लोक गेले निघून

First published: April 27, 2019, 1:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading