काँग्रेसच्या स्टार प्रचारकांकडून भाजपच्या सुजय विखेंचा प्रचार, फोटो व्हायरल

काँग्रेसच्या स्टार प्रचारकांकडून भाजपच्या सुजय विखेंचा प्रचार, फोटो व्हायरल

काँग्रेसने नुकतीच राधाकृष्ण विखे पाटील यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती केली होती. त्यामुळे या बैठकीतला फोटो व्हायरल होत आहे.

  • Share this:

अहमदनगर, 11 एप्रिल : काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे भाजप उमेदवार आणि त्यांचे पुत्र सुजय विखे यांच्या बैठकीत उपस्थित राहिले आहेत. काँग्रेसने नुकतीच राधाकृष्ण विखे पाटील यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती केली होती. त्यामुळे या बैठकीतला फोटो व्हायरल होत आहे.

राधाकृष्ण विखे सुजय विखे यांचा प्रचार करत असल्याचे उघड झालं आहे. या बैठकीनंतर राधाकृष्ण विखे यांनी मात्र कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान, 'राधाकृष्ण विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटलांचा भाजपप्रवेश भाजपप्रवेश निश्चित झाला आहे. भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अहमदनगर येथे 12 एप्रिल रोजी जाहीर सभा आहे. या सभेत राधाकृष्ण विखे पाटील मोदी यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश करणार आहेत,' अशी माहिती आहे.

नगरमध्ये भाजप Vsराष्ट्रवादी

सुजय पाटलांनी थेट भाजपचाच झेंडा हातात घेत या मतदारसंघात राष्ट्रवादीला आव्हान दिलं आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीनेही ही जागा प्रतिष्ठेची केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार संग्राम जगताप यांना नगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुजय विखे यांच्याविरोधात आता नगरमधून राष्ट्रवादीने तगडा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे आता नगरची लोकसभा निवडणूक मोठी रंगतदार असणार आहे.

VIDEO : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आठवले म्हणतात, 'राष्ट्रवादीच्या रामराजेंना पाठिंबा द्या'

First published: April 11, 2019, 2:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading