जनतेचा 'नायक' होण्यासाठी राजू शेट्टींना मदत करणार बॉलिवूडमधील 'हा' व्हिलन

जनतेचा 'नायक' होण्यासाठी राजू शेट्टींना मदत करणार बॉलिवूडमधील 'हा' व्हिलन

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रत्येक उमेदवार विजयसाठी जोर लावताना दिसत आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 9 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रत्येक उमेदवार विजयसाठी जोर लावताना दिसत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी अभिनेते प्रकाश राज हे सभा घेणार आहेत.

राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी आपल्या खलनायकी भूमिकांसाठी ओळखले जाणारे  प्रकाश राज मैदानात उतरले आहेत. प्रकाश राज यांची हातकणंगलेमध्ये 19 किंवा 20 एप्रिलला सभा होईल, अशी माहिती आहे. राजू शेट्टी यांनी देशपातळीवर झालेल्या शेतकरी आंदोलनात सहभाग घेतलेला आहे. याच कारणामुळे प्रकाश राज हे शेट्टींच्या प्रचारासाठी येतील, अशी माहिती आहे.

हातकणंगले आणि राजू शेट्टींचे राजकारण

हातकणंगले हा मतदारसंघ मुख्यत: ऊसपट्टा आणि कारखानदारीचा भाग म्हणून ओळखला जातो. राजू शेट्टी यांनी या पट्ट्यावर आपल्या सततच्या आंदोलनांतून आणि सक्रिय राजकारणातून चांगलंच वर्चस्व निर्माण केलं आहे. म्हणजे या मतदारसंघामध्ये येणाऱ्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थात शिवसेना-भाजप ताकदवान असतानाही लोकसभा निवडणुकीत बाजी मारण्यात मात्र राजू शेट्टी यशस्वी ठरतात.

या मतदारसंघाच्या अंतर्गत येणारे विधानसभा मतदारसंघ

शाहूवाडी

हातकणंगले

इचलकरंजी

शिरोळ

इस्लामपूर

शिराळा

काय आहे सध्याची राजकीय स्थिती?

नाही नाही म्हणता आता शिवसेना-भाजपची युती झाली आहे. हा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेकडे गेला आहे. शिवसेनेने राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांचे सुपुत्र धैर्यशील माने यांनी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळेल.

VIDEO : विखे पाटील भाजपात जाणार? पृथ्वीराज चव्हाण म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 9, 2019 08:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading