मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सोलापूर की अकोला, दोन्ही जागी जिंकल्यास कोणती सोडणार? आंबेडकर म्हणाले...

सोलापूर की अकोला, दोन्ही जागी जिंकल्यास कोणती सोडणार? आंबेडकर म्हणाले...

दोन्ही जागांवर विजय मिळवला, तर ते कोणती जागा सोडणार? असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांना विचारण्यात आला होता.

दोन्ही जागांवर विजय मिळवला, तर ते कोणती जागा सोडणार? असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांना विचारण्यात आला होता.

दोन्ही जागांवर विजय मिळवला, तर ते कोणती जागा सोडणार? असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांना विचारण्यात आला होता.

    मुंबई, 3 मे : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे सोलापूर आणि अकोला या दोन मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही जागांवर त्यांना काँग्रेस आणि भाजपचं तगडं आव्हान आहे. पण अशा परिस्थितीतही त्यांनी जर दोन्ही जागांवर विजय मिळवला, तर ते कोणती जागा सोडणार? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. जागा सोडण्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी केवळ स्मितहास्य करत आताच याबाबत आपण प्रतिक्रिया देणार नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, यावेळी आंबेडकरांनी पंतप्रधानपदाबाबतचा अंदाजही व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू आणि मायावती या पंतप्रधानपदाच्या दावेदार ठरू शकतात, असं म्हटलं होतं. पवारांच्या या वक्तव्यावर संपूर्ण देशात चर्चा सुरु झाली होती. आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा डॉ.प्रकाश आंबेडकर यांनीही पंतप्रधानपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 'देशाचा आगामी पंतप्रधान हा काँग्रेस किंवा भाजपचा नसेल. त्यामुळे राहुल गांधी किंवा नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याची शक्यता नाही. निवडणुकींनंतर माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा हे पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार ठरू शकतात,' असा अंदाज प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. 'पवारांना पंतप्रधानपदासाठी लायक मानत नाही' 'शरद पवारांना मी पंतप्रधानपदाच्या लायक मानत नाही. ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू आणि केसीआर हे देखील कधीच पंतप्रधान होणार नाहीत,' असं विधान आंबेडकरांनी केलं आहे. 'भाजपच्या 50 जागा कमी होणार' यंदाच्या निकालात भाजपला 148 ते 200 जागा मिळतील असा अंदाज आंबेडकरांनी व्यक्त केला. तर काँग्रेसला 100पर्यंत जागा मिळतील असे आंबेडकर म्हणाले. VIDEO: मुंबईच्या रस्त्यावर धावली 'द बर्निंग बस'
    First published:

    Tags: Akola, Akola S13p06, Maharashtra Lok Sabha election 2019, Prakash ambedkar, Solapur, Solapur S13p42

    पुढील बातम्या