सुशीलकुमारांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर काँग्रेसवर भडकले

सुशीलकुमारांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर काँग्रेसवर भडकले

प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

  • Share this:

सोलापूर, 14 एप्रिल : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. पण त्यानंतर झालेल्या राजकीय चर्चेनंतर प्रकाश आंबेडकर काँग्रेसवर भडकले आहेत.

'काँग्रेस हा गाढवांचा पक्ष आहे. त्यामुळे निवडणुकीवेळी ते असा गाढवपणा करणार हे मला माहिती होते. निवडणुकीत भेटी-गाठी होतात. पण त्याचं राजकारण करणं काँग्रेसला जमतं,' असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

सोलापुरात हाय-होल्टेज सामना

सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा बालेकिल्ला. पण मागील लोकसभा निवडणुकीत भाजपचे शरद बनसोडे हे जाएंट किलर ठरले. त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.

सोलापुरातील यंदाची निवडणूक तिरंगी होणार आहे. कारण काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे, वंचित आघाडीकडून प्रकाश आंबेडकर आणि भाजपकडून जयसिद्धेश्वर स्वामी मैदानात आहेत.

कोणकोणत्या विधानसभा मतदारसंघांचा समावेश?

मोहोळ

सोलापूर शहर उत्तर

सोलापूर शहर मध्य

अक्कलकोट

सोलापूर दक्षिण

पंढरपूर

या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व असल्याचं पाहायला मिळतं. पण मागील निवडणुकीत भाजपने चांगली कामगिरी करत सहापैकी दोन मतदारसंघात विजय मिळवला. लोकसभेत मिळालेल्या यशाच्या तुलनेत हे यश कमी असलं तरीही ते दुर्लक्षित करण्यासारखं नाही.

VIDEO : अन् रणजितसिंह मोहिते पाटील पक्षच विसरले, भाजपच्या सभेत केली चूक

First published: April 14, 2019, 2:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading