'मुख्यमंत्री सर तुम्ही आपलं तोंड खराब करुन घेऊ नका'

'मुख्यमंत्री सर तुम्ही आपलं तोंड खराब करुन घेऊ नका'

'मी कुणाचा नामोल्लेख करणार नाही आणि मुख्यमंत्री सर तुम्ही पण आपलं तोंड खराब करून घेऊ नये'

  • Share this:

बीड, 13 एप्रिल : 'मी जनतेसमोर साष्टांग दंडवत घेईल पण बाकी कोणासमोर झुकणार नाही. मी स्टँडर्ड राजकारण केलं आहे. त्यामुळे मी कुणाचा नामोल्लेख करणार नाही आणि मुख्यमंत्री सर तुम्ही पण आपलं तोंड खराब करून घेऊ नये,' असा सल्ला जाहीर सभेत भाजप नेत्या आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमधील सभेत विनायक मेटे यांना थेट इशारा दिल्यानंतर पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना हा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री फडणवीस मेटेंना उद्देशून म्हणाले की, 'जो बीडमध्ये भाजपसोबत तोच राज्यात महायुती सोबत असेल. त्यांना माझं सांगणं आहे भारतीय जनता पार्टी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्याशिवाय पूर्ण होत नाही. म्हणून जो गोपीनाथ मुंडेंसोबत राहू शकत नाही तो भाजपसोबतही नाही.'

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी बीडमध्ये राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. वास्तविक शिवसंग्राम हा पक्ष महायुतीचा घटकपक्ष आहे. असं असताना बीडमध्ये मात्र त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

"मुंडे साहेबांची शिकवण आहे मोडेन पण वाकणार नाही. हा माझ्या जीवनाचा मूलमंत्र आहे. मी साष्टांग दंडवत घेईल, पण फक्त जनतेसमोर. बाकी कोणासमोर झुकणार नाही. मी स्टँडर्ड राजकारण केलं आहे. मी कुणाचा नामोल्लेख करणार नाही आणि मुख्यमंत्री सर तुम्ही पण आपलं तोंड खराब करून घेऊ नये," असं म्हणत पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे विनायक मेटेंवर निशाणा साधला आहे.

...आणि कांचन कुल यांना आमदारसाहेबांनी घेतलं उचलून, VIDEO व्हायरल

First published: April 13, 2019, 8:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading