निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील धक्कादायक वास्तव समोर

निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील धक्कादायक वास्तव समोर

लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाची तारीख अगदी जवळ आली असताना नागपुरातील भयाण वास्तव समोर आलं आहे.

  • Share this:

नागपूर, 6 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाची तारीख अगदी जवळ आली असताना नागपुरातील भयाण वास्तव समोर आलं आहे. नागपूर जिल्ह्यातील साधारण 200 मतदानकेंद्रावर सध्या वीज नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी नागपूरमध्ये 11 एप्रिलला मतदान होणार आहे. पण वीजबिल थकल्याने मतदान केंद्र असलेल्या शाळांमधील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा असलेल्या नागपुरातच ही अवस्था समोर आल्याने प्रशासनाची गोची झाली आहे.

या सगळ्या प्रकारामुळे प्रशासनावर विजेची तात्पुरती व्यवस्था करण्याची नामुष्की ओढवली आहे. साधारणत: 200 मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी वीजेची तात्पुरती व्यवस्था होणार आहे. याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी माहिती दिली आहे.

दरम्यान, या वीजपुरवठ्याबाबतच्या या तात्पुरत्या उपायोजनेमुळे निवडणुका तर पार पडतील, पण त्यानंतर विद्यार्थांचं काय? असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.

VIDEO: अजित पवार म्हणाले... 'पार्थने केलेली चूक फासावर चढवण्याऐवढी गंभीर नाही'

First published: April 6, 2019, 5:00 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading