बीड : राष्ट्रवादी की प्रीतम मुंडे? अखेर जयदत्त क्षीरसागरांनी जाहीर केली भूमिका

बीड : राष्ट्रवादी की प्रीतम मुंडे? अखेर जयदत्त क्षीरसागरांनी जाहीर केली भूमिका

'भाजपला मदत करून विजयाची गुढी उभारा. डॉ. प्रीतम मुंडे यांना मतदान करा'

  • Share this:

बीड, 5 एप्रिल : राष्ट्रवादीचे नाराज आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुसाठी अखेर आपली भूमिका जाहीर केली आहे. 'भाजपला मदत करून विजयाची गुढी उभारा. डॉ. प्रीतम मुंडे यांना मतदान करा,' असं जाहीर आवाहन आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलवली होती. याच बैठकीतून आमदार क्षीरसागर यांनी आपला लढा कुणाविरुद्ध आहे, यबाबत अप्रत्यक्ष भाष्य केलं आहे. 'लढा...गुंडगिरी विरोधात, घरफोड्यांविरोधात आणि जातीयवाद्यांविरोधात,' अशी वाक्य क्षीरसागर यांच्या बैठकीच्या स्टेजवरील बॅनरवर लिहिण्यात आली आहेत.

जयदत्त क्षीरसागर हे गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी आणि धनंजय मुंडे यांच्यावर नाराज आहेत. याच पार्श्वभूमीवर आता त्यांनी कार्यकर्तांची बैठक बोलवली.

कोणत्या पक्षात जाणार?

जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपच्या लोकसभा उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या मदतीची भूमिका घेतली असली तरीही आपण कोणत्या पक्षात जाणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा केली नाही. याचा निर्णय 18 एप्रिलला घेऊ, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या बैठकीत क्षीरसागर समर्थकांकडून धनंजय मुंडेंसह पक्ष नेतृत्वावर सडकून टीका करण्यात आली. 'मागच्या दरातून आलेले, घर फोडणारे, गुंडगिरी करणारे यांना धडा शिकवा,' असं म्हणत धनंजय मुंडेंवर निशाणा साधण्यात येत आहे.

'ज्या पक्षात सन्मानाची वागणूक मिळत नाही. विश्वासात घेतले जात नाही. वारंवार अपमानास्पद वागणूक दिली जात असेल तर अशा राष्ट्रवादी पक्षात अण्णांनी का राहावं? असा सवाल जाहीर भाषणात क्षीरसागर समर्थकांनी केला आहे.

VIDEO : 5 वर्षांत निधी कुठे आला? प्रीतम मुंडेंच्या प्रचाराला गेलेल्या भाजपच्या आमदारावर गावकरी भडकले

First published: April 5, 2019, 7:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading