नाशिकच्या सभेत तरी नरेंद्र मोदी कांदा प्रश्नावर बोलणार का?

नाशिकच्या सभेत तरी नरेंद्र मोदी कांदा प्रश्नावर बोलणार का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नाशिकच्या पिंपळगाव इथं सभा होणार आहे. पण मोदींची ही सभा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे ती कांदा उत्पादकांच्या प्रश्नांमुळे.

  • Share this:

नाशिक, 22 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नाशिकच्या पिंपळगाव इथं सभा होणार आहे. पण मोदींची ही सभा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे ती कांदा उत्पादकांच्या प्रश्नांमुळे. या सभेच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी शासनाकडे पत्र पाठवून परवानगीही मागितली आहे.

कांदा उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे. त्यामुळे त्यांच्या व्यथा मांडण्यासाठी नरेंद्र मोदी यांना भेटण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी शासन व प्रशासनाकडे केली.

कष्टाने पिकवलेल्या कांद्याला मातीमोल भाव मिळाल्यानंतर नाशिकमधील संजय साठे यांनी 29 सप्टेंबरला कांदा विक्रीतून मिळालेले 1 हजार 64 रुपयांची मनीऑर्डर पंतप्रधानांना केली होती. त्यावेळी प्रतिकांद्याला 1 रुपया 40 पैसे इतका भाव मिळाला होता .

संजय साठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हाधिकारी यांना मेल करून पंतप्रधानांना भेटण्याची परवानगी मागितली असून शासन व प्रशासन त्यांना परवानगी देतात की नाही आणि आजच्या सभेत कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर पंतप्रधान काही भाष्य करतात का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

VIDEO : साताऱ्यातील आजींनी दिल्या शिव्या, म्हणाल्या कशाला पाहिजे सरकार?

First published: April 22, 2019, 11:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading