निवडणुकीत मोदींनी पुन्हा खेळलं OBC कार्ड, माढ्याच्या सभेत म्हणाले...

निवडणुकीत मोदींनी पुन्हा खेळलं OBC कार्ड, माढ्याच्या सभेत म्हणाले...

नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत पुन्हा एकदा जातीचं कार्ड वापरण्याचा प्रयत्न केला आहे.

  • Share this:

माढा, 17 एप्रिल : 'काँग्रेसने ज्याचं नाव मोदी आहे, त्याला शिव्या द्यायला सुरुवात केली आहे. मी मागासवर्गीय असल्यामुळे मला अशी टीका सतत सहन करावी लागते. काँग्रेसने मला अनेकदा माझी जात सांगणाऱ्या शिव्या दिल्या आहेत,' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माढ्यातील सभेत काँग्रेसवर टीका केली आहे. याद्वारे नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत पुन्हा एकदा जातीचं कार्ड वापरण्याचा प्रयत्न केला आहे.

'चौकीदार चोर है,' असं म्हणत राफेल करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वारंवार मोदींना लक्ष्य केलं आहे. पण मोदींनी या टीकेला आता थेट आपल्या जातीशी जोडल्याचं पाहायला मिळालं आहे.

'शरद पवार यांना वाऱ्याची दिशा लक्षात आली. ते असं कधीच काही करत नाहीत, ज्यातून त्यांचं नुकसान होईल. वाऱ्याची दिशा बदलत असल्याचं लक्षात आल्याने शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली,' असं म्हणत माढ्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघाकडे भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची लढाई म्हणून बघत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला जिंकण्यासाठी आता भाजपने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेचं आयोजन केलं आहे.

माढ्यात राष्ट्रवादी Vs भाजप

रणजितसिंह मोहिते पाटलांना भाजपमध्ये घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी खेळी खेळत संजय शिंदे यांना आपल्याकडे खेचले आणि उमेदवारी दिली.

शरद पवार यांच्या या खेळीमुळे भाजपसमोर उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. या पार्श्वभूमीवर माढ्यात आता जोरदार लढत होण्याची शक्यता आहे.

VIDEO : चिक्की घोटाळ्याच्या आरोपानंतर पंकजांचा पलटवार, धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2019 11:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading