माढ्यातील मोदींची सभा रद्द होणार? काँग्रेसने विरोध करण्यामागे दिलं 'हे' कारण

माढ्यातील मोदींची सभा रद्द होणार? काँग्रेसने विरोध करण्यामागे दिलं 'हे' कारण

अकलूजमध्ये 17 एप्रिलला होणारी नरेंद्र मोदी यांची सभा रद्द करावी अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी केली आहे.

  • Share this:

माढा, 14 एप्रिल : माढा हा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेचा केला आहे. त्यामुळे भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभा घेणार आहेत. पण या सभेबाबत काँग्रेसने आक्षेप नोंदवला आहे.

अकलूजमध्ये 17 एप्रिलला होणारी नरेंद्र मोदी यांची सभा रद्द करावी अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी केली आहे. 'सोलापूरमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी 18 एप्रिलला मतदान होणार आहे. मोदी ज्या अकलूजमध्ये प्रचारसभा घेणार आहेत तिथून सोलापूर अवघ्या 100 किमी अंतरावर आहे. त्यामुळे नियमाप्रमाणे मतदानाच्या 24 तास आधी अशी प्रचारसभा घेता येत नाही,' असं काँग्रेसचं म्हणणं आहे.

माढ्यात राष्ट्रवादी Vs भाजप

रणजितसिंह मोहिते पाटलांना भाजपमध्ये घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी खेळी खेळत संजय शिंदे यांना आपल्याकडे खेचले आणि उमेदवारी दिली.

शरद पवार यांच्या या खेळीमुळे भाजपसमोर उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. या पार्श्वभूमीवर माढ्यात आता जोरदार लढत होण्याची शक्यता आहे.

VIDEO :...म्हणून पार्थला दिल्लीत पाठवा, अजित पवारांचा तरुणांना मिश्किल सल्ला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 14, 2019 09:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading