'आमच्या सभांची गर्दी पाहून विरोधक घाबरले', नाशिकच्या सभेत मोदींचा हल्लाबोल

'आमच्या सभांची गर्दी पाहून विरोधक घाबरले', नाशिकच्या सभेत मोदींचा हल्लाबोल

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींची नाशिकमधील पिंपळगाव इथं जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवरून काँग्रेसवर टीका केली.

  • Share this:

नाशिक, 22 एप्रिल : 'आमच्या सभांची गर्दी पाहून विरोधक घाबरले आहेत,' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी जोरदार टीका केली आहे. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींची नाशिकमधील पिंपळगाव इथं जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवरून काँग्रेसवर टीका केली.

शेतकरी प्रश्नावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसने सत्ता असताना शेतकरी ते ग्राहक अशी थेट घेवाण-देवाण होऊ दिली नाही, असा आरोप करत नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका केली आहे.

मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे:

नाशिकच्या पवित्र भूमीत येऊन धन्य झालो

भारताकडे कुणीही वाकड्या नजरेने पाहू शकत नाही

आरोग्य व्यवस्था आणि उद्योगांचं जाळं विकसित केलं

प्रत्येक गरीबाचं बँक खातं सुरू करून दिलं

आमच्या कार्यकाळात दहशतवादी हल्ले झाले नाहीत

काँग्रेसच्या काळात सतत दहशतवादी हल्ले

गरीबांना मोफत आरोग्यव्यवस्था सुरू करून दिली

देशाच्या प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले

आमच्या सभांची गर्दी पाहून विरोधक घाबरले

SPECIAL REPORT : पवार, मोहिते पाटील आणि मुख्यमंत्री...माढ्यात जोरदार संघर्ष

First published: April 22, 2019, 1:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading