मावळमध्ये दोन्ही पक्षांकडून जोरदार हालचाली, 'हा' आहे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्लॅन

मावळमध्ये दोन्ही पक्षांकडून जोरदार हालचाली, 'हा' आहे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्लॅन

तिसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर राज्यभरातील राष्ट्रवादीचे अनेक नेते मावळमध्ये दाखल झाले आहेत.

  • Share this:

मावळ, 26 एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार मैदानात आहेत. त्यामुळे या जागेवर पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दुसरीकडे हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे हा किल्ला राखण्यासाठी शिवसेनाही शर्थीचे प्रयत्न करत आहे.

तिसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर राज्यभरातील राष्ट्रवादीचे अनेक नेते मावळमध्ये दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीकडून घरोघरी जाऊन प्रचार करण्यात येत आहे. तर दुसरीकडे, पार्थ पवारांचं तगडं आव्हान पाहता शिवसेनेनंही जोर लावला आहे. अनेक नाराज पदाधिकाऱ्यांची समजून काढून त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवसेनेचे उपनेते रविंद्र मिर्लेकर यांनी पिंपरी चिंचवडमधील जुन्या शिवसैनिकांची बैठक घेतल्याची माहिती आहे.

मावळ मतदारसंघात 29 एप्रिलला मतदान होत आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्ष आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी जोर लावत आहे. त्यामुळे मतदार नेमका कुणाला कौल देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मावळमधील राजकीय स्थिती

मावळमधून शिवसेनेकडून पुन्हा एकदा श्रीरंग बारणे यांनाच उमेदवारी दिली आहे. गेल्या पाच वर्षात त्यांनी आपला जनसंपर्क वाढवण्यावर विशेष भर दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. पण ही लढाई आता श्रीरंग बारणे यांच्यासाठी सोपी असणार नाही. कारण पार्थ पवार यांच्या रूपाने या मतदारसंघात राष्ट्रवादी तुल्यबळ उमेदवार उतरवला आहे. तसंच शेकापच्या जयंत पाटील यांनीही पार्थ पवार यांच्या उमेवारीला पाठिंबा दिला आहे. फक्त पाठिंबाच नव्हे तर पार्थ यांना उमेदवारी द्यावी, यासाठी जयंत पाटील यांनी शरद पवारांकडे गळदेखील घातली होती. त्यामुळे या मतदारसंघातून शेकाप आपली संपूर्ण ताकद राष्ट्रवादीच्या मागे लावणार आहे.

अशावेळी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना राष्ट्रवादीकडून जोरदार टक्कर दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मावळमधील लढत चुरशीची ठरणार आहे.

VIDEO : साध्वींचं कौतुक करताना भाजप खासदाराचं हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य

First published: April 26, 2019, 12:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading