विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे जाणार? पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानानंतर चर्चा

विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे जाणार? पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानानंतर चर्चा

पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या विधानानंतर हे पद राष्ट्रवादीकडे जाण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.

  • Share this:

प्रफुल्ल साळुंखे, मुंबई, 26 एप्रिल : काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. विरोधी पक्षनेतेपदाबाबत काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या विधानानंतर हे पद राष्ट्रवादीकडे जाण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.

'विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाईल, हे आता सांगता येणार नाही. विखे गेल्यावर काँग्रेस आमदारांची संख्या किती राहील, त्यावरून पुढील निर्णय घेण्यात येईल. सर्वात जास्त सदस्य कुणाचे राहतील यावरही याबाबतची गणितं ठरणार आहेत,' असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडेही जाऊ शकते, याबाबतचे संकते दिले आहेत.

विखेंचा राजीनामा काँग्रेसने स्वीकारला

मुलाला पक्षाने जागा मिळवून दिली नाही म्हणून पक्षावर नाराज असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांना अखेर काँग्रेसने पक्षाने विरोधी पक्षनेतेपदातून मुक्त केलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राहुल गांधी यांनी विखे पाटलांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा स्वीकारला आहे, अशी माहिती दिली. त्यामुळे विखे आता 27 तारखेला काय घोषणा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

अहमदनगरचे मतदान पार पडल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात दाखल झाले आहे. गावी गावी ते समर्थकांच्या बैठका घेत आहेत. विखे पाटील हाच आमचा पक्ष असून ते जो आदेश देतील त्यानुसार काम करण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

VIDEO: पार्थ पवार आणि बारणेंच्या लढतीत 'या' अपक्ष उमेदवाराने वेधून घेतलं सर्वांचंच लक्ष

First published: April 26, 2019, 2:27 PM IST

ताज्या बातम्या