बीडमध्ये नक्की लढा कुणाविरुद्ध? आमदार क्षीरसागर यांनी अखेर दिलं उत्तर

बीडमध्ये नक्की लढा कुणाविरुद्ध? आमदार क्षीरसागर यांनी अखेर दिलं उत्तर

जयदत्त क्षीरसागर हे गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी आणि धनंजय मुंडे यांच्यावर नाराज आहेत.

  • Share this:

बीड, 5 एप्रिल : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या निर्णायक बैठकीला सुरुवात झाली आहे. याच बैठकीतून आमदार क्षीरसागर यांनी आपला लढा कुणाविरुद्ध आहे, यबाबत अप्रत्यक्ष भाष्य केलं आहे. 'लढा...गुंडगिरी विरोधात, घरफोड्यांविरोधात आणि जातीयवाद्यांविरोधात,' अशी वाक्य क्षीरसागर यांच्या बैठकीच्या स्टेजवरील बॅनरवर लिहिण्यात आली आहेत.

जयदत्त क्षीरसागर हे गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी आणि धनंजय मुंडे यांच्यावर नाराज आहेत. याच पार्श्वभूमीवर आता त्यांनी कार्यकर्तांची बैठक बोलवली आहे. यामध्ये ते आपल्या राजकीय वाटचालीबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या बैठकीत क्षीरसागर समर्थकांकडून धनंजय मुंडेंसह पक्ष नेतृत्वावर सडकून टीका करण्यात येत आहेत. 'मागच्या दरातून आलेले, घर फोडणारे, गुंडगिरी करणारे यांना धडा शिकवा,' असं म्हणत धनंजय मुंडेंवर निशाणा साधण्यात येत आहे.

'ज्या पक्षात सन्मानाची वागणूक मिळत नाही. विश्वासात घेतले जात नाही. वारंवार अपमानास्पद वागणूक दिली जात असेल तर अशा राष्ट्रवादी पक्षात अण्णांनी का राहावं? असा सवाल जाहीर भाषणात क्षीरसागर समर्थक करत आहेत.

या बैठकीत आमदार जयदत्त क्षीरसागर कुठला निर्णय करतात आणि काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे.

VIDEO : 5 वर्षांत निधी कुठे आला? प्रीतम मुंडेंच्या प्रचाराला गेलेल्या भाजपच्या आमदारावर गावकरी भडकले

First published: April 5, 2019, 5:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading