प्रकाश आंबेडकरांचं खळबळजनक वक्तव्य, गिरीश महाजनांनी उडवली खिल्ली

प्रकाश आंबेडकरांचं खळबळजनक वक्तव्य, गिरीश महाजनांनी उडवली खिल्ली

आम्ही सत्तेत आल्यास निवडणूक आयोगाला तुरूंगात टाकू, असं वादग्रस्त वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 4 एप्रिल : निवडणूक आयोगाबाबत वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. त्यावर आता भाजप नेते आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'प्रकाश आंबेडकर यांची एकही जागा निवडून येणार नाही. त्यामुळे ते काहीही बोलत आहे,' असा हल्लाबोल गिरीश महाजन यांनी केला आहे.

आम्ही सत्तेत आल्यास निवडणूक आयोगाला तुरूंगात टाकू, असं वादग्रस्त वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यानंतर या वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाने अहवाल मागितला होता. हा अहवाल जिल्हा प्रशासनाने पाठविला आहे. त्यामुळे यापुढे निवडणूक आयोग काय पाऊलं उचलतं, हे पाहावं लागेल.

काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?

''निवडणूक आयोग म्हणतं पुलवामा घटनेवर तुम्ही बोलायचं नाही. आम्ही बोलू, कारण संविधानानं आम्हाला बोलण्याचा अधिकार दिला आहे. निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं असून आम्ही सत्तेत आलो तर यांना जेलमध्ये टाकू'' असा इशाराच प्रकाश आंबेडकरांनी दिला.

वंचित आघाडीच्या प्रचारासाठी आयोजित सभेच्या मंचावरून त्यांनी हे वक्तव्य केलं. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातून लढत असलेल्या वंचित आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आंबेडकरांची प्रचारसभा यवतमाळ इथं आयोजित करण्यात आली होती.

VIDEO: ...तर निवडणूक आयोगाला जेलमध्ये पाठवू - प्रकाश आंबेडकर

First published: April 4, 2019, 5:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading