'लवकर बरे व्हा', नाशिकच्या युवकांनी गिरीश महाजनांना पाठवला झंडु बाम

'लवकर बरे व्हा', नाशिकच्या युवकांनी गिरीश महाजनांना पाठवला झंडु बाम

नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना भांडण सोडवताना धक्काबुक्की झाली. त्यामुळे नाशिकच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना चक्क बाम आणि मलम पाठवला आहे.

  • Share this:

नाशिक, 15 एप्रिल : प्रसिद्धीची एकही संधी न सोडण्याचा हव्यास काही लोकांना असतो. नाशिकलाही काही युवकांनी एक असाच स्टंट केलाय. जळगावमधील अंमळनेर इथं भाजपच्या नुकत्याच झालेल्या एका बैठकीत पक्षांतर्गत वादावादीमुळे राज्याचे जलसंपदा आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना भांडण सोडवताना धक्काबुक्की झाली. त्यामुळे नाशिकच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना चक्क बाम आणि मलम पाठवला आहे.

नाशिकमधील युवकांनी गिरीश महाजन यांना बाम आणि मलम तर पाठवलाच पण त्यासोबतच 'लवकर बरे व्हा, पण नाशिकच्या सेवेत रूजू व्हा' असा उपरोधिक सल्लाही दिला आहे. या सर्व प्रकाराची आता मोठी चर्चा होत असल्याचं दिसत आहे.

सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी वाटपावरून वाद सुरू आहेत. भाजपमध्ये अनेक पक्षांतील इच्छुक नेते येत असून त्यात भाजप फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप होत आहे. त्यातच जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथे भाजपाच्या मेळाव्यात लोकसभेच्या उमेदवारीवरून जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार बी. एस. पाटील यांच्यात हाणामारी झाली.

यावेळी गिरीश महाजन हे मध्ये पडल्यानं  डॉ. बी. एस. पाटील हे वाचले खरे मात्र त्यांना वाचवताना काही उत्साही कार्यकर्त्यांकडून महाजन यांना धक्काबुक्की झाली. गिरीश महाजन यांना झालेली मारहाण ही अन्य पक्षात फोडाफोडी करण्याचं फळ आहे, असं यासंदर्भात बाम पाठवणाऱ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

VIDEO: आणि म्हणून मोदींऐवजी बारामतीत अमित शहा घेणार सभा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 15, 2019 07:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading