जळगावमधील भाजप उमेदवार अडचणीत, धमकी दिल्याप्रकरणी वडिलांवर गुन्हा दाखल

जळगावमधील भाजप उमेदवार अडचणीत, धमकी दिल्याप्रकरणी वडिलांवर गुन्हा दाखल

जळगाव भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत धुसफूस समोर येत आहे.

  • Share this:

जळगाव, 22 एप्रिल : जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार उन्मेष पाटील यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी उन्मेष पाटील यांचे वडील भैय्यासाहेब पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगाव भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत धुसफूस समोर येत आहे. अशातच आता भाजपचेच नेते असलेल्या कैलास सूर्यवंशी यांनी भैय्यासाहेब पाटील यांच्याविरोधात धमकी दिल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे मतदानाला काही दिवस बाकी असतानाच उन्मेश पाटील यांच्यासमोरील अडचणी वाढल्याचं बोललं जात आहे.

जळगावमधील लोकसभेचा रणसंग्राम

जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव लोकसभा मतदार संघाची निवडणूक होतेय. ही निवडणूक फक्त उमेदवार निवडण्यासाठी होणार नाही. जळगाव जिल्ह्याचा भावी नेता कोण? हेही ठरवणारी आहे, हे निश्चित.

जिल्ह्यात एकनाथ खडसे यांच वर्चस्व राहीलं आहे. सतीश पाटील, सुरेश जैन, मनीष जैन यांचा अपवाद वगळला तर खडसेंना जिल्हाभर विरोध करण्याची हिंमत कुणी दाखवली नाही. मंत्रिपदावरुन पायउतार झाल्यानंतर मात्र गिरीश महाजन यांनी खडसेंचा गडाला अक्षरशः सुरुंग लावले. महापालिका, जिल्हा परिषद, विधान परिषद या निवडणुकीत भाजपला न भूतो असं यश मिळवून दिलं. आता लोकसभेच्या निमित्ताने पुन्हा दोन्ही नेते रिंगणात आहेत. रावेरचा गड खडसेंना राखायचा आहे तर गिरीश महाजन यांनी आपाल्या उमेदवारसाठी प्रतिष्ठा पणाला लावलीय.

खडसे-महाजन यांची ही निवडणूक वाटत असली तरी खरी लढाई भविष्यात जिल्ह्यावर कोण सत्ता गाजवले याची आहे. रक्षा खडसे आणि उन्मेष पाटील यांच्यामधून जिल्ह्याचा नेता कोण होईल? या वर्चस्वाची सुरवात आहे. रक्षा खडसे अत्यंत आक्रमक नेत्या आहेत, कामाचा सपाटा, अभ्यास, मतदार संघावर पकड, गतीमान हालचाली हे त्यांचं वैशिष्ट्य आहे.

उन्मेष पाटील यांची राजकीय महत्त्वाकांक्षा , ती साध्य करण्यासाठी टोकाला जायची तयारी, भविष्याचा अभ्यास आणि पेरणी हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. खडसे- महाजन नेते असतानाही उन्मेष पाटील यांनी आमदार असतानाही तीन वर्षांत जिल्ह्यात स्वतःची नवी टीम निर्माण केली. पुढच्या पाच वर्षांत एकनाथ खडसे यांची राजकीय गतिमानता किती असेल? ती जागा निश्चित रक्षा खडसे भरुन काढतील. रक्षा खडसे यांना जिल्ह्यातील खडसे निष्ठावंतचा मोठा पाठिंबा आपसूकच मिळेल. ती त्यांची जमेची बाजू असेल.

भविष्यात सत्ता असेल नसेल तरी देखील गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वासमोर एक-एक आव्हान उभं राहील. की केलं जाईल? हे वास्तव आहे. हीच संधी उन्मेष पाटील यांच्या पथ्यावर पडेल. तोपर्यंत आगामी 5 सहा वर्षांत जिल्ह्यात उन्मेष पाटील यांची नवी टीम उदयाला आलेली असेल. दोन्ही खासदारची जळगाववर वर्चस्व निर्माणची लढाई असेल. भविष्यात मुक्ताईनगरमधून खडसे यांच्या वारसदारकडे मतदार संघ सोपवून रक्षा खडसे जळगाववर लक्ष केंद्रित करतील. तर चाळीसगाव मतदार संघ आपल्या भविष्यासाठी पत्नी संपदा पाटील यांच्याकडे सोपवून उन्मेष पाटील जळगाव शहरात ठाण मांडतील. येथेच जिल्ह्यावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी रक्षा खडसे उन्मेष पाटील यांच्यात संघर्ष उभा राहील.

VIDEO : पंतप्रधान मोदींना अजित पवारांनी काढला चिमटा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 22, 2019 07:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading