कोल्हापूर, 6 एप्रिल : ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या विधानाबाबत 24 तासांत खुलासा करावा, अशी नोटीस खा. राजू शेट्टी यांना बजावण्यात आली आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी नंदकुमार काटकर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
सैन्यात आपली पोरं सैन्यात जातात. देशपांडे, कुलकर्णी सैन्यात जात नाहीत असं वादग्रस्त विधान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी केलं होतं. त्यानंतर पुण्यातील ब्राह्मण जागृती सेवा संघानं खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. शिवाय, आंदोलनाची देखील हाक दिली होती.
दरम्यान, या प्रकरणावर आता राजू शेट्टी यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. 'बोलताना माझ्याकडून अनावधनानं उल्लेख झाला. माझा उद्देश हा शहीद जवान आणि वारसांना न्याय देण्याचा होता. कुणीही माझ्या वक्तव्याने वाईट वाटून घेऊ नये,' असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. शिवाय, माझ्या मनाला जातीयवाद शिवू शकत नाही. मी फुले, शाहू, आंबेडकरांच्या जडणघडणीतला असून शरद जोशी यांच्या संघटनेचा मला वारसा असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या वादावर आता राजू शेट्टी यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
नेते प्रचाराला अन् गावकरी पाण्याला; हिंगोली जिल्ह्याचा SPECIAL REPORT