भाजप खासदारांचा दावा ठरला खोटा, माकपकडून उमेदवारी अर्ज दाखल

भाजप खासदारांचा दावा ठरला खोटा, माकपकडून उमेदवारी अर्ज दाखल

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचं तिकीट कापण्यात आलं आहे.

  • Share this:

नाशिक, 5 एप्रिल : दिंडोरी लोकसभेसाठी माकपच्या जे.पी. गावित यांनी अखेर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे मला माकपकडून उमेदवारी मिळणार असल्याचा भाजप खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचा दावा खोटा ठरला आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचं तिकीट कापण्यात आलं आहे. त्यानंतर नाराज हरिश्चंद्र चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केला आहे. त्यामुळे ते बंडखोरी करणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

तिकीट वाटपात भाजपने डावलल्यानंतर खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे माकप आणि राष्ट्रवादी आणि माकपच्या संपर्कात असल्याचं पाहायला बोललं जात होतं. त्या ते भाजपविरोधात दंड थोपटतील, अशी शक्यता निर्माण झाली होती. पण आता माकपकडून तरी त्यांना उमेदवारी मिळणार नाही, हे स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी सोडून भाजपचा झेंडा हाती घेतलेल्या डॉ.भारती पवार यांना भाजपने दिंडोरी लोकसभा उमेदवार म्हणून निश्चित झालं आहे. त्यामुळे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण चांगलेच नाराज झाले. डॉ. भारती यांच्या प्रवेश प्रकरणात पक्षानं विश्वासात न घेतल्याचं त्यांच्या चांगलंच जिव्हारी लागलं आहे. चव्हाण यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पक्षाशी प्रामाणिक असताना चव्हाण यांना का डावललं असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांनी याआधीच उपस्थित केला आहे.

VIDEO : 2014 मध्ये बारामती का जिंकता आली नाही? मुख्यमंत्र्यांनी दिलं 'हे' कारण

First published: April 5, 2019, 4:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading