मतदानाच्या आधीच शिर्डीत काँग्रेसला धक्का, जिल्हाध्यक्षाचा राजीनामा

मतदानाच्या आधीच शिर्डीत काँग्रेसला धक्का, जिल्हाध्यक्षाचा राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील हे गेले काही दिवस काँग्रेसमध्ये नाराज आहेत. त्यानंतर आता त्यांचे समर्थकही काँग्रेसपासून दूर होताना दिसत आहेत.

  • Share this:

शिर्डी, 25 एप्रिल : अहमदनगरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसंच शिर्डी मतदारसंघात काँग्रेसला मत देऊ नका, असं आवाहनही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे.

राधाकृष्ण विखे पाटील हे गेले काही दिवस काँग्रेसमध्ये नाराज आहेत. त्यानंतर आता त्यांचे समर्थकही काँग्रेसपासून दूर होताना दिसत आहेत. अशातच आता नगर जिल्हाध्यक्षांनीही राजीनामा दिला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदानाला काही दिवसच बाकी असताना घडलेल्या या घडामोडींमुळे हा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.

विखेही काँग्रेसमधून बाहेर पडणार?

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे शिर्डी लोकसभा मतदारसंघात सभा घेणार आहेत. पण राहुल गांधी यांची ही सभा संगमनेरमध्ये होणार आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे यांना शह देत बाळासाहेब थोरात यांना ताकद देण्याचे प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाकडून सुरू झाले आहेत का, अशी चर्चा रंगत आहे.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डीऐवजी त्यांचे अंतर्गत विरोधक मानले जाणाऱ्या बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर इथं राहुल गांधींची सभा होत आहे. यातून काँग्रेस भविष्यातील संकेत देत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, नुकतीच राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.राधाकृष्ण विखेंना बाजूला सारून नेते होण्याची बाळासाहेब थोरातांची धडपड सुरु आहे. काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला गेलाय, अशा शब्दात विखे पाटलांनी घणाघाती टीका केली. पक्षात असतानाही शिर्डी लोकसभेत पक्षाच्या बॅनरवरून वगळले. आता विखेंशिवाय पर्याय नाही, म्हणून पुन्हा माझा फोटो लावलाय, असंही विखे पाटलांनी यावेळी सांगितले.

VIDEO: NCP नगरसेविकेच्या पतीवर कुऱ्हाड, तलवारीनं सपासप वार

First published: April 25, 2019, 1:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading