मुख्यमंत्री करणार राज ठाकरेंची पोलखोल? शेवटच्या दिवशी महाराष्ट्रात प्रचारसभांचा धडाका

राज ठाकरे यांच्या प्रचारतोफांमुळे घायाळ झालेली भाजपही आता राज यांना त्यांच्याच शैलीत उत्तर देण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 27, 2019 10:01 AM IST

मुख्यमंत्री करणार राज ठाकरेंची पोलखोल? शेवटच्या दिवशी महाराष्ट्रात प्रचारसभांचा धडाका

मुंबई, 27 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी प्रत्येक पक्षातील हायप्रोफाईल नेते मैदानात उतरल्याचं चित्र आहे. आजही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा होणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचारतोफांमुळे घायाळ झालेली भाजपही आता राज यांना त्यांच्याच शैलीत उत्तर देण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिकमधील सभेत राज ठाकरेंबाबतचे व्हिडिओ सादर करून त्यांच्यावर पलटवार करतील, अशी माहिती आहे.

महाराष्ट्रात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नेते आपल्या पक्षातील उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात असतील.

कुणाची किती वाजता सभा?

मुख्यमंत्री सभा – सकाऴी 9 वाजता – नाशिक

Loading...

शरद पवार सभा – सटाणा - सकाळी 9 वाजता

उद्धव ठाकरे सभा – पालघर – दुपारी 2 वाजता

अजित पवार सभा - खेड – दुपारी 2 वाजता

सुबोध भावे सभा – जुन्नर – दुपारी 2

नितीन गडकरी सभा - शिर्डी - दुपारी 2 वाजता

शरद पवार सभा – पिंपरी-चिंचवड - दुपारी 3 वाजता


VIDEO : मोदींची मुंबईतील सभा, भाषण सुरू असतानाच अनेक लोक गेले निघून


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2019 10:01 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...