सर्वात उशिरा जाहीर होऊ शकतो बीड मतदारसंघाचा निकाल, 'हे' आहे कारण

लोकसभा निवडणुकीसाठी 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: May 17, 2019 12:06 PM IST

सर्वात उशिरा जाहीर होऊ शकतो बीड मतदारसंघाचा निकाल, 'हे' आहे कारण

मुंबई, 17 मे : लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान होत आहे. यातील पाच टप्पे पूर्ण झाले असून दोन टप्प्यांसाठीचं मतदान बाकी आहे. पण ही मतदानप्रक्रिया संपण्याआधीच अनेकांना निवडणूक निकालाची उत्सुकता लागली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे. यावेळी महाराष्ट्रातून गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचा निकाल सर्वात आधी हाती येण्याची शक्यता आहे. साधारणत: दुपारी 1 वाजेपर्यंत या मतदारसंघातील निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. कारण या मतदारसंघातून सर्वात कमी म्हणजेच 5 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत.

बीडच्या निकालाला होऊ शकतो उशीर

बीड लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपच्या विद्यमान खासदार प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांच्यात काँटे की टक्कर होत आहे. या मतदारसंघात सर्वात जास्त 36 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या जागेवरचा निकाल उशिरा येऊ शकतो. 23 मे रोजी साधारणत: 4 वाजता या मतदारसंघात नेमकं कोण बाजी मारणार, हे स्पष्ट होईल अशी शक्यता आहे.

साताऱ्याचा निकाल लवकरच अपेक्षित

Loading...

गडचिरोलीपाठोबात साताऱ्यात सर्वाधिक कमी उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे या जागेवरही 23 मे रोजी दुपारी 1 वाजता निकाल लागण्याची शक्यता आहे. गडचिरोली आणि साताऱ्यानंतर लातूर, नंदूरबार, रत्नागिरी, पालघर या मतदारसंघांतील चित्र स्पष्ट होईल.

दरम्यान, पंतप्रधानपदी कोण बसणार याबाबत आतापासूनच अंदाज बांधले जाऊ लागले आहेत. विरोधकांनी तशी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. तुमच्याकडे पंतप्रधानपदाचा चेहरा कोण? या प्रश्नावरून भाजपकडून विरोधकांना टार्गेट करण्यात येतं. त्यामुळे आता पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी विरोधी पक्षांची 21 मे रोजी दिल्लीत बैठक होणार आहे.

भाजपविरोधी आघाडीच्या या बैठकीत पंतप्रधानपदाच्या नावाबाबत चर्चा होणार आहे. याबाबत चंद्राबाबू नायडू यांनी माहिती दिली आहे. या बैठकीला तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी, बसपा अध्यक्षा मायावती, अखिलेश यादव, शरद पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.


SPECIAL REPORT : दुर्योधन ते औरंगजेब... राजीव गांधींवरील टीकेनंतर PM मोदी टार्गेटवर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 9, 2019 02:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...