'विखे-पाटील राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांचंच काम करतील'

'विखे-पाटील राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांचंच काम करतील'

'राधाकृष्ण विखे पाटील आमचे जेष्ठ नेते आहेत. ते विश्वासार्हता जपतील असा विश्वास आहे.'

  • Share this:

अहमदनगर, 11 एप्रिल : काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा वेग पकडत आहेत. अशातच आता काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटलांवर तिरकस टीका केली आहे. 'विखे-पाटील भाजपच्या बैठकांना गेले तरी ते राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांचंच काम करतील,' असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

'राधाकृष्ण विखे पाटील आमचे जेष्ठ नेते आहेत. ते विश्वासार्हता जपतील असा विश्वास आहे. ते जिथे जातील तिथे काँग्रेसचं काम करतील. विखे पाटील भाजपच्या बैठकीला गेले तरी ते काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं काम करतील,' असं तिरकस भाष्य खरत बाळासाहेब थोरात यांनी विखे-पाटलांवर हल्लाबोल केला आहे.

विखेंचा भाजप प्रवेश

राधाकृष्ण विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटलांचा भाजपप्रवेश भाजपप्रवेश निश्चित झाला आहे, अशी माहिती आहे. भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अहमदनगर येथे 12 एप्रिल रोजी जाहीर सभा आहे. या सभेत राधाकृष्ण विखे पाटील मोदी यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश करणार आहेत. तर 17 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत अकलुज येथील सभेत विजयसिंह मोहिते पाटील भाजपप्रवेश करणार आहेत.

मुलांपाठोपाठ हे ज्येष्ठ नेतेही करणार भाजप प्रवेश

राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आधीच भाजप प्रवेश केला आहे. मुलांपाठोपाठ आता हे पितादेखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे महाआघाडी मोठा धक्का मानला जात आहे.

VIDEO : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आठवले म्हणतात, 'राष्ट्रवादीच्या रामराजेंना पाठिंबा द्या'

First published: April 11, 2019, 12:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading