बारामतीत भाजपचा प्रयत्न फसणार? तीन कट्टर विरोधक एकाच मंचावर

बारामतीत भाजपचा प्रयत्न फसणार? तीन कट्टर विरोधक एकाच मंचावर

हर्षवर्धन पाटील यांची अप्रत्यक्ष मदत घेण्याचा भाजपचा प्रयत्न फसला का, याची चर्चा रंगू लागली आहे.

  • Share this:

इंदापूर, 18 एप्रिल : मागील अनेक वर्षांच्या राजकारणात विळ्या-भोपळ्याचं नातं असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हे दोन नेते आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी व्यासपीठावर इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे हेदेखील उपस्थित होते. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांची अप्रत्यक्ष मदत घेण्याचा भाजपचा प्रयत्न फसला का, याची चर्चा रंगू लागली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पवार-पाटील यांच्यात मनोमिलन झालं आहे. त्यानंतर प्रथमच हे दोन्ही नेते इंदापूर तालुक्यात एकाच व्यासपीठावर आले आहेत. त्यामुळं हा सध्या चर्चेचा विषय ठरला असून, आज होत असलेल्या सभांबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. हे तीन नेते एकाच मंचावर आल्याने विळ्याभोपळ्याचे सख्य असलेल्या या नेत्यांना एकत्र पाहताना उपस्थितांचे यांच्या वक्तव्याकडे लक्ष लागले होते.

अजित पवार आणि हर्षवर्धन पाटिलांचे राजकारण

अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील हे एकाच जिल्ह्यातले हे दोन वजनदार नेते. गेली अनेक वर्ष पक्ष वेगवेगळे असले तरी एकाच सरकारमध्ये या दोघांनीही मंत्री म्हणून एकत्र काम केलं आहे. पण या दोन्ही नेत्यांचं कधीच जमलं नाही. विधानसभेसह अन्य निवडणुकांमधील विरोध, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील संघर्ष असं बरंच काही इंदापूर तालुक्यात घडलं. आघाडी असली तरी इथलं शह-काटशहाचं राजकरण कधीही थांबलं नाही.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत आघाडीत बिघाडी झाल्यानंतर राष्ट्रवादीनं हर्षवर्धन पाटील यांच्याविरोधात दत्तात्रय भरणे यांना मैदानात उतरवलं. त्यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. तेव्हापासून पवार-पाटील यांच्यातील संघर्ष अधिकच वाढला.

मागील दोन-तीन वर्षांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र काम करत असतानाही इंदापूरमध्ये मात्र वेगळंच चित्र पहायला मिळालं. मात्र आज प्रथमच आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी इंदापूर तालुक्यातील व्यासपीठावर हे सर्व नेते एकत्र आल्याने या सभांकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं.

SPECIAL REPORT : 'लाव रे तो व्हिडिओ'

First published: April 18, 2019, 1:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading