भाजपच्या बंडखोर नेत्याला ACB कडून नोटीस, चौकशीही सुरू

भाजपच्या बंडखोर नेत्याला ACB कडून नोटीस, चौकशीही सुरू

नाशिकमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात भाजपच्या माणिकराव कोकाटेंनी बंडखोरी केली आहे.

  • Share this:

नाशिक, 9 एप्रिल : भाजपाचे बंडखोर उमेदवार आणि माझी आमदार माणिकराव कोकाटे यांना ACB कडून नोटीस पाठवण्यात आली आहे. ऐन निवडणूक काळात माणिकराव कोकाटे यांना  नोटीस पाठवून चौकशी साठी बोलवण्यात आलं आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातुन तिकीट न मिळाल्याने कोकाटे यांनी बंडखोरी केली आहे. त्यानंतर लगेचच झालेल्या एसीबीच्या कारवाईने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता असल्याने चौकशी करण्यात येत असल्याची माहिती आहे.

दरम्यान, भाजप-सेना युती झाली असली तरी सगळं काही अलबेल नसल्याचं पुन्हा एकदा उघड झालं आहे. नाशिकमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात भाजपच्या माणिकराव कोकाटेंनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे युतीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.

दिंडोरीतही भाजपमध्ये बंडखोरी?

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचं तिकीट कापण्यात आलं आहे. त्यानंतर नाराज हरिश्चंद्र चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केला आहे. त्यामुळे ते बंडखोरी करणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

तिकीट वाटपात भाजपने डावलल्यानंतर खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे माकप आणि राष्ट्रवादी आणि माकपच्या संपर्कात असल्याचं पाहायला बोललं जात होतं. त्या ते भाजपविरोधात दंड थोपटतील, अशी शक्यता निर्माण झाली होती. पण आता माकपकडून तरी त्यांना उमेदवारी मिळणार नाही, हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे ते अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

VIDEO: 'डे विथ लिडर' : असा सुरू होतो नवनीत राणां यांचा दिवस

First published: April 9, 2019, 10:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading