औरंगाबादमध्ये सत्तारांचं धक्कातंत्र, काँग्रेसला नाही तर 'या' उमेदवाराला पाठिंबा

औरंगाबादमध्ये सत्तारांचं धक्कातंत्र, काँग्रेसला नाही तर 'या' उमेदवाराला पाठिंबा

सिल्लोडमधील काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 15 एप्रिल : सिल्लोडमधील काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

अब्दुल सत्तार काँग्रेसवर नाराज झाल्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. पण आता त्यांनी युतीच्या उमेदवाराला पाठिंबा न देता भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा दिला आहे. हर्षवर्धन जाधव औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणुकीत रिंगणात उतरले आहेत.

अब्दुल सत्तार आणि नाराजीनाट्य

अब्दुल सत्तार यांनी राजीनामा देत लोकसभा निवडणूक अपक्ष लढवणार असल्याची भूमिका घेतली होती. पण त्यानंतर नाट्यमय घडामोडी घडल्या. सत्तार यांनी गिरीश महाजनांसह थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीनंतर अब्दुल सत्तारही आता भाजपच्या गोटात दाखल होणार का, याबाबत जोरदार चर्चा रंगू लागली होती.

वास्तविक सत्तार हे काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे आणि अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात. पण जागावाटपावेळी चव्हाण यांनी सत्तार यांच्या नावाचा विचार न करता सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्याने सत्तार नाराज झाले.

राजीनामा देताना काय म्हणाले होते अब्दुल सत्तार?

'मी कुणावरही नाराज नाही. मी औरंगाबादमधून उमेदवारी मागितली होती. पण पक्षाने मला उमेदवारी दिली नाही. मी काँग्रेसचा राजीनामा आधीच दिलेला आहे. आता काँग्रेस आमदार म्हणून बोलत नाही. मी लोकसभा निवडणुकीत अपक्ष लढत देणार आहे,' अशी घोषणाही अब्दुल सत्तार यांनी केली होती.

VIDEO : 'पुन्हा असं बोलायचं नाही', जाहीर सभेतच शरद पवारांनी दिली अमरसिंह पंडितांना वॉर्निंग

First published: April 15, 2019, 11:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading