बीड, 30 मार्च : जेव्हा कुणी विरोधात जायला तयार नव्हतं तेव्हा राष्ट्रवादीसाठी मानेवर सुरी घेऊन मी गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात गेलो. पण राष्ट्रवादीने आपल्याला पक्षातून बाहेर काढलं, असं म्हणत सुरेश धस यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रचार सभेत त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.