'पुतण्याने पवारांची विकेट घेतली', मोदींच्या टीकेनंतर सुप्रिया सुळे म्हणतात...

'पुतण्याने पवारांची विकेट घेतली', मोदींच्या टीकेनंतर सुप्रिया सुळे म्हणतात...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा इथं झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादीवर टीका केली. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदींना प्रत्युत्तर दिलं आहे.

  • Share this:

अद्वैत मेहता, पुणे, 1 एप्रिल : 'पुतण्याने पवारांची विकेट घेतली' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा इथं झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादीवर टीका केली. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदींना प्रत्युत्तर दिलं आहे. 'आमच्या घराबाबतीत मोदींनी केलेला आरोप हस्यास्पद आहे. महत्त्वाचे प्रश्न सोडून पंतप्रधान इतर विषयांवरच बोलत आहेत, हे दुर्दैवी आहे,' असा पलटवार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

पवारांनी माघार घेतल्याच्या आरोपाबद्दल काय म्हणाल्या सुळे?

'शरद पवारांवर बोलल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही, हा 50 वर्षांचा इतिहास आहे. पंतप्रधान मोदी 5 वर्षांत केलेल्या कामांवर बोलतील अशी अपेक्षा होती. पण ते शेती, बेरोजगारी, नोटबंदीमुळे झालेलं नुकसान या मुद्द्यांवर बोललेच नाहीत,' असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

'पवारांना टार्गेट केल्याशिवाय हेडलाईन मिळत नाही'

अजित पवार कधीही जेलमध्ये जाऊ शकतात, असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. याबाबत प्रश्न विचारत असताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'पवारांना टार्गेट केल्याशिवाय हेडलाईन मिळत नाही. त्यामुळे अशा प्रकारची टीका केली जाते.'

बारामतीत यावेळी कितपत आव्हान?

'बारामतीत मी कामं केली आहेत. प्रत्येक निवडणुकीकडे मी आव्हान म्हणूनच बघते. पण केलेल्या कामांच्या जोरावर मी निवडून येणार,' असा आत्मविश्वास सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलाय. दरम्यान, या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपने कंबर कसली आहे.

VIDEO: हिंदूंचा अपमान करण्याचे पाप काँग्रेसने केले; मोदींचं UNCUT भाषण

First published: April 1, 2019, 6:50 PM IST

ताज्या बातम्या