सोलापूरमध्ये प्रकाश आंबेडकरांना दिलासा, या उमेदवाराने अर्ज मागे घेत दिला पाठिंबा

सोलापूरमध्ये प्रकाश आंबेडकरांना दिलासा, या उमेदवाराने अर्ज मागे घेत दिला पाठिंबा

सोलापूरमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर सुशीलकुमार शिंदे आणि भाजपच्या जयसिद्धेश्वर स्वामी यांचं आव्हान आहे.

  • Share this:

सोलापूर, 29 मार्च : वंचित बहुजन आघाडीचे नेतृत्व करत असलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकाश आंबेडकरांना या मतदारसंघात दिलासा मिळाला आहे. कारण बसपचे उमेदवार राहुल सरवदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा दिला आहे.

सोलापूरमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर सुशीलकुमार शिंदे आणि भाजपच्या जयसिद्धेश्वर स्वामी यांचं आव्हान आहे. सोलापूरमध्ये दलित मतदारांची संख्या लक्षणीय आहे. अशातच बसपचाही उमेदवार रिंगणात उतरल्याने त्याचा फटका प्रकाश आंबेडकर यांना बसला असता.

प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात बसपच्या उमेदवाराने लढू नये, अशी दलित संघटनांची मागणी होती. बसपने वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा द्यावा, अशी मागणी स्थानिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर बसपच्या राहुल सरवदे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात कोणकोणत्या विधानसभा मतदारसंघांचा समावेश?

मोहोळ

सोलापूर शहर उत्तर

सोलापूर शहर मध्य

अक्कलकोट

सोलापूर दक्षिण

पंढरपूर

या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व असल्याचं पाहायला मिळतं. पण मागील निवडणुकीत भाजपने चांगली कामगिरी करत सहापैकी दोन मतदारसंघात विजय मिळवला. लोकसभेत मिळालेल्या यशाच्या तुलनेत हे यश कमी असलं तरीही ते दुर्लक्षित करण्यासारखं नाही. त्यामुळे यंदाही भाजपकडून सुशीलकुमार शिंदेसमोर तगडं आव्हान उभं केलं जाणार आहे.

मागच्या दोन निवडणुकांत काय होती स्थिती?

2009 मध्ये लोकसभा निवडणुकीत सोलापुरातून विजयी झालेल्या सुशीलकुमार शिंदे यांना 3,87,591 इतकी मतं मिळाली होती. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपच्या शरद बनसोडे यांच्या पारड्यात 2,87,959 इतक्या मतदारांनी कौल टाकला होता.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत सगळीच पारंपरिक समीकरणं बदलली होती. कारण या निवडणुकीत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या नावाचं देशभर गारूड पसरलं होतं. याचाच फायदा सोलापुरातून भाजपचे उमेदवार असलेल्या शरद बनसोड यांनाही झाला. या निवडणूक त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा जवळपास दीड लाख मतांच्या फरकाने पराभव केला होता. या मोठ्या विजयाने बनसोड यांनी राज्याचं लक्ष वेधून घेतलं होतं.

शरद बनसोडे यांना मिळालेली मतं - 5,17,879

सुशीलकुमार शिंदे यांना मिळालेली मतं - 3,68,205

मतदार संख्या आणि स्वरूप

एकूण मतदार - 17, 02, 739

इतक्या लोकांनी बजावला मतदानाचा हक्क - 9,51,510

पुरुष मतदार - 52.49 टक्के

महिला मतदार - 47.51 टक्के

मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न

पाणी आणि रस्ते हा या मतदारसंघातील कळीचा मुद्दा आहे. या लोकसभा मतदारसंघातील बहुतांश भागाला कायमच दुष्काळाला तोंड द्यावं लागतं. यंदाही हा भाग भीषण दुष्काळाने होरपळत आहे. जनावरे आणि शेतीसाठीच्या पाण्याशिवायच अनेक भागामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. रस्त्यांची स्थितीही बिकट असल्याचं चित्र आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत याच प्रश्नांवर रान पेटण्याची शक्यता आहे.

VIDEO माझं पहिलं भाषण का ट्रोल झालं? पाहा पार्थ पवार काय म्हणाले..

First published: March 29, 2019, 6:33 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading