Home /News /maharashtra /

सांगली लोकसभा : 'लढेन तर राष्ट्रवादीकडूनच', स्मिता पाटील निवडणुकीच्या रिंगणात?

सांगली लोकसभा : 'लढेन तर राष्ट्रवादीकडूनच', स्मिता पाटील निवडणुकीच्या रिंगणात?

स्मिता पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या हालचाली राष्ट्रवादीत सुरू झाल्या आहेत.

    सांगली, 29 मार्च : आघाडीतला सांगलीच्या जागेचा तिढाही अजूनही कायम आहे. काँग्रेसनं सांगली लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडल्यास राष्ट्रवादीचे नेते दिवंगत आर.आर पाटलांची मुलगी स्मिता पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या हालचाली राष्ट्रवादीत सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे, सांगलीच्या जागेचा आग्रह धरणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनंही स्मिता पाटील यांना गळ घालण्यास सुरुवात केली आहे. स्मिता पाटीलनं स्वाभिमानीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी असा आग्रह स्वाभिमानीनं धरला आहे. मात्र स्मिता पाटील यांनी वडिलांच्याच अर्थात राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढणार असल्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. दरम्यान, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अनेक गड ढासळले. सांगली लोकसभा मतदासंघही याला अपवाद नव्हता. संजय काका पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून आयात करून भाजपने काँग्रेसला आस्मान दाखवलं. त्यामुळे भाजपची पाळमुळं या मतदारसंघात रोवायला मदत झाली आहे. पंतगराव कदम आणि आर. आर. पाटील या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दोन मोठ्या नेत्यांची कमतरता त्यांना या निवडणुकीत जाणवणार आहे. कारण यावेळी काँग्रेसचा उमेदवार निश्चित करतानाही नाकीनऊ आले आहेत. काय आहे सध्याची राजकीय स्थिती? मागील निवडणुकीतप्रमाणे काँग्रेसला ही निवडणूकही जड जाण्याची शक्यता आहे. कारण पक्षांतर्गत असलेले विविध गट आणि त्यातून अद्यापपर्यंत उमेदवार निश्चिती करण्यात आलेलं अपयश, हे काँग्रेससमोरील मोठं आव्हान असणार आहे. तसंच दिवंगत पतंगराव कदम आणि आर. आर. पाटील यांच्या अनुपस्थितीत होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे त्यांची कमीहीदेखील काँग्रेसला जाणवणार आहे. हा मतदारसंघ नक्की काँग्रेसकडे राहणार की मित्रपक्षाला दिला जाणार, याबाबतही अजून निश्चिती नाही. दुसरीकडे, विद्यमान खासदार संजय पाटील हेच पुन्हा एकदा भाजपचे उमेदवार असणार आहेत. संजय पाटील यांच्यासमोरही पक्षांतर्गत विरोध हे आव्हान असणारंच आहे. पण त्याला न जुमानता त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालं आहे. जर काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी एकदिलाने संजय पाटील यांना आव्हान दिलं तर ही निवडणूक चुरशीची होणार आहे. VIDEO माझं पहिलं भाषण का ट्रोल झालं? पाहा पार्थ पवार काय म्हणाले..
    First published:

    Tags: Election 2019, Lok sabha election 2019, Maharashtra Lok Sabha Elections 2019, Sangali

    पुढील बातम्या