मावळ लोकसभा : शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणेंच्या अडचणींत वाढ

मावळ लोकसभा : शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणेंच्या अडचणींत वाढ

शिवसेना-भाजप युतीतील वाद मिटताना दिसत नाहीत. त्यामुळे श्रीरंग बारणे यांच्यासमोरील अडचणींत वाढ झाली आहे.

  • Share this:

गोविंद वाकडे, मावळ, 2 एप्रिल : 'मी याआधी गैरसमज झाल्याने भाजपवर आरोप केले होते,' असं मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मान्य केलं. पण त्यानंतरही शिवसेना-भाजप युतीतील वाद मिटताना दिसत नाहीत. त्यामुळे श्रीरंग बारणे यांच्यासमोरील अडचणींत वाढ झाली आहे.

श्रीरंग बारणे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना एकजुटीने काम करण्यासाठी आवाहन करणारं निवेदन जाहीर केलं. पण त्यावर अजूनही भाजपकडून प्रतिसाद नाहीच.

दरम्यान, भाजपचे पिंपरी-चिंचवडमधील आमदार लक्ष्मण जगताप यांचा श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला विरोध आहे. शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी आमदरा जगताप यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही तोडगा निघू शकलेला नाही.

मावळमध्ये होणार जोरदार लढत

राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठीची मावळमधून पार्थ अजित पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे मावळ मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. आता जाहीर झालेल्या उमेदवारी यादीत शिवसेनेकडून बारणे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.

गेल्या दोन निवडणुकांत या मतदारसंघात शिवसेनेचंच वर्चस्व पाहायला मिळालं आहे. यावेळी मात्र हा मतदारसंघ चर्चेत आला तो राष्ट्रवादीच्या नव्या खेळीने. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेत आपण तरुण पिढीला म्हणजेच पार्थ पवार यांना संधी देत असल्याचं सांगितल्याने पार्थ मावळमधून लढत आहेत.

या मतदारसंघात पार्थ पवार यांची उमेदवारी पुढे येण्याची अनेक कारणं आहेत. मुख्य कारण म्हणजे या ठिकाणाहून राष्ट्रवादीकडे कोणताही तुल्यबळ स्थानिक उमेदवार नाही. तसेच या मतदारसंघात असलेल्या पिंपरी-चिंचवडसह मोठ्या भागात अजित पवार यांना मानणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आधीच उमेदवाराची असलेली कमतरता आणि त्यातच अजित पवार यांचे पुत्र म्हणून पार्थ पवार यांच्यामागे उभे राहणारी कार्यकर्त्यांची ताकद, या सगळ्या परिस्थितीमुळे मावळमधून पार्थ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

VIDEO : रावसाहेब दानवे पुन्हा चुकले! विंग कमांडर अभिनंदनबद्दल केलं 'हे' वक्तव्य

First published: April 2, 2019, 8:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading