शिवसेनेचे साताऱ्याचे उमेदवार म्हणतात, 'एकच डॅशिंग राजे...शिवेंद्रराजे'

शिवसेनेचे साताऱ्याचे उमेदवार म्हणतात, 'एकच डॅशिंग राजे...शिवेंद्रराजे'

नरेंद्र पाटील यांनी शिवेंद्रराजे यांच्यावर स्तुतीसुमनेही उधळत 'एकच डॅशिंग राजे शिवेंद्रराजे' अशा घोषणाही दिल्या.

  • Share this:

सातारा, 30 मार्च : राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे यांच्या वाढदिवसाला सातारा लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी हजेरी लावली आहे. तसंच यावेळी नरेंद्र पाटील यांनी शिवेंद्रराजे यांच्यावर स्तुतीसुमनेही उधळत 'एकच डॅशिंग राजे शिवेंद्रराजे' अशा घोषणाही दिल्या. त्यामुळे साताऱ्यातील राजकीय चर्चांनी पुन्हा वेग पकडला आहे.

शिवेंद्रराजे आणि साताऱ्यातील राष्ट्रवादीचे लोकसभा उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे नाते सर्वश्रुत आहे. अशातच नरेंद्र पाटील यांनी शिवेंद्रराजे यांची जवळीक जिल्हातील राजकारणाला नवं वळण देऊ शकते.

उदयनराजे आणि राष्ट्रवादीतील धुसपूस

उदयनराजे यांचे साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांबरोबर सतत खटके उडत असतात. शशिकांत शिंदे आणि शिवेंद्रराजे या राष्ट्रवादीच्या आमदारांनी आपली नाराजी अनेकदा उघडपणे बोलुनही दाखवली आहे. पण उदयनराजेंची मतदारांवरील पकड पाहता शरद पवार यांनी त्यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे तिकीट दिलं आहे

कोण आहेत नरेंद्र पाटील?

नरेंद्र पाटील हे सध्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळावर अध्यक्ष आहेत. ते जर उदयनराजेंविरोधात उभे राहिल्याने सातारा मतदारसंघात चांगली लढत होईल, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. कारण शिवसेना-भाजप युतीची ताकद आणि माथाडी कामगार नेते अशी ओळख यामुळे नरेंद्र पाटील उदयनराजेंसमोर आव्हान निर्माण करू शकतात.

VIDEO: ..आणि नातीने नाकारली शहा आजोबांची टोपी

First published: March 30, 2019, 5:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading