नगरमध्ये 'सोशल मीडिया वॉर', 'या' कारणामुळे दोन्ही उमेदवारांचं जोरदार ट्रोलिंग

नगरमध्ये 'सोशल मीडिया वॉर', 'या' कारणामुळे दोन्ही उमेदवारांचं जोरदार ट्रोलिंग

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचा सोशल मीडियात एक फोटो व्हायरल होत असून या फोटोवरून सुजय विखेंवर टीका करण्यात येत आहे.

  • Share this:

अहमदनगर, 3 एप्रिल : निवडणुकीत कोणता मुद्दा कधी चर्चेत येईल, हे सांगता येत नाही. अहमदनगरच्या राजकारणातही सध्या हेच पाहायला मिळत आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचा सोशल मीडियात एक फोटो व्हायरल होत असून या फोटोवरून सुजय विखेंवर टीका करण्यात येत आहे.

राहुरीतील जिल्हा परिषद सदस्य आणि राष्ट्रवादीचे नेते शिवाजी गाडे यांचं दुर्दैवी निधन झालं. त्यानंतर सुजय विखे हे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गेले. पण त्याठिकाणी काढण्यात आलेला सुजय विखे यांचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोत श्रद्धांजली वाहताना सुजय विखे आणि त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते हे पोझ देताना दिसत आहेत.

सोशल मीडियावरील व्हायरल फोटो

सोशल मीडियावरील व्हायरल फोटो

सुजय विखेंना परिस्थितीचं गांभीर्य नसल्याचा आरोप करत विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. दुसरीकडे, नगरमधीलच राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांनाही सोशल मीडियावर लक्ष्य करण्यात येत आहे. कारण शिवाजी गाडे या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचं निधन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मोठी रॅली काढत संग्राम यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यातून संग्राम यांची असंवेदनशीलता दिसते, अशी टीका त्यांच्यावर करण्यात येत आहे.

दरम्यान, निवडणुका आल्यानंतर कोणत्या मुद्द्यावर राजकारण सुरू होईल, हे सांगता येत नाही. एका व्यक्तीच्या निधनानंतर नगरमध्ये सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांतून हेच चित्र समोर आलं आहे.

VIDEO : लोकसभा निवडणुकीतून पत्ता कट झाल्यानंतर सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया

First published: April 3, 2019, 8:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading