राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या मुलीवर लॉकडाऊनमध्ये आली उपासमारीची वेळ!

राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या मुलीवर लॉकडाऊनमध्ये आली उपासमारीची वेळ!

नांदगाव जवळील जमनापाड्यात राहणारी हाली बरफ आपल्या मोठ्या बहिणीसोबत सरपणाची लाकडे आणण्यासाठी जंगलात गेली होती.

  • Share this:

भिवंडी, 15 एप्रिल: महाराष्ट्राला दिल्लीत सन्मान मिळवून देणारी शहापूर तालुक्यातील शौर्यवान हाली बरफ हिच्यावर   कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. एकीकडे काही राजकीय पक्ष व सामाजिक संस्था मदतरुपात मोठ्या प्रमाणावर जीवनावश्यक वस्तू गाव-पाड्यात गोरगरीब आदिवासी लोकांना पुरवत आहेत. परंतु राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या हाली बरफ हिच्याकडे मात्र प्रशासन आणि सामाजिक संस्थांचं दुर्लक्ष झालं आहे.

बिबट्याने जबड्यातून बहिणीची केली होती सुटका...

शहापूर तालुक्यातील नांदगाव जवळील जमनापाड्यात राहणारी हाली बरफ आपल्या मोठ्या बहिणीसोबत सरपणाची लाकडे आणण्यासाठी जंगलात गेली होती. तानसा अभयारण्याजवळील या जंगलात त्यावेळी एका बिबट्याने तिच्या मोठ्या बहिणीवर हल्ला केला होता. बिबट्यासमोर कोणीही पळ काढला असता पण हाली थोडीही डगमगली नाही. बिबट्याने हालीच्या बहिणीला पूर्ण घायाळ केलं असताना तिने बहिणीला वाचविण्यासाठी बिबट्याचा सामना केला होता. शेवटी हालीकडून होणाऱ्या दगडांच्या माऱ्यापुढे बिबट्याने हार मानत माघार घेत तिथून पळ काढला होता. हालीनेच आपल्या  बहिणीचे प्राण वाचवले. हालीच्या या शौर्याची दाखल घेऊन भारत सरकारकडून तिला 2013 मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. एका आदिवासी वस्तीतील पंधरा वर्षांच्या मुलीला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळतो, ही बाब महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावणारी आहे.

'आधी लढा कोरोनाशी' असं म्हणत या पोलिसांनी काय निर्णय घेतला पाहून तुम्ही कराल सला

मात्र, तरी देखील हाली ही कायम दुर्लक्षित राहिली आहे. विवाहानंतरही तिला एका आदिवासी पाड्यावर हालाखीचे जीवन सध्या जगावे लागत आहे. कुकांबे येथे ती सध्या राहात आहे.

लॉकडाऊनमुळे रोजगार बुडाला...

आदिवासी विकास विभागाच्या पेंढरघोळ आश्रमशाळेत हाली तात्पुरत्या स्वरूपात रोजंदारीवर झाडू मारण्याचं काम करत होती. मात्र, सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन व संचार बंदीमुळे सरकारी आश्रमशाळा बंद आहेत. त्यामुळे हाली हे झाडू मारण्याचे रोजंदारीचे काम पण बंद पडले आहे. आता हालीच्या हाताला काम नाही. त्यातच लॉकडाऊनमुळे पतीची रोजंदारीची कामेही ठप्प पडल्याने केवळ हातावर पोट असल्याने रोजीरोटीचा प्रश्न हालीच्या कुटुंबा समोर उभा टाकला आहे .

घरची परिस्थिती हालाखीची झाल्याने प्रशासन व राजकीय पुढारी सामाजिक संस्था या  सगळ्यांचे कमालीचे दुर्लक्ष आता प्रकर्षांने दिसून येत आहे. लॉकडाऊनच्या काळात वेळेत जीवनावश्यक वस्तू राष्ट्रीय पुरस्कार विजेती हाली बरफपर्यंत पोहचू न शकल्याने दुर्दैवाने हाली बरफ व तिच्या कुटुंबावर आता उपासमारीची वेळ आली आहे.

अन्य बातम्या

Plasma Therapy कोरोनावर उपचार होण्याची शक्यता; असं वाचवलं जाणार रुग्णांना

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 3 हजारांच्या जवळ, मृत्यूची संख्या 187वर

First published: April 15, 2020, 9:16 PM IST
Tags:

ताज्या बातम्या