मुंबई, 9 एप्रिल: राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ब्रेक द चेन उपाययोजने अंतर्गत काही निर्बंद लागू केले आहेत. या अंतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी काही अटींसह सर्व प्रासंगी सेवांसह सार्वजनिक वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, याच दरम्यान नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याच संदर्भात आता राज्य शासनाने महत्वाची माहिती दिली आहे.
सुपरमार्केट, डी मार्ट, बिग बाझार सुरू असणार का?
राज्य शासनाच्या यापूर्वीच्या नियमावलीनुसार, अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार. मात्र, इतर वस्तूंचे विभाग बंद असतील.
वीकेंड लॉकडाऊन दरम्यान काय सुरू काय बंद?
ब्रेक द चेनच्या आदेशात म्हटल्याप्रमाणे आवश्यक सेवा सुरू राहतील. कोणताही व्यक्ती योग्य कारणांशिवाय फिरू शकणार नाही. ही कारणे आदेशात नमूद करण्यात आली आहेत.
वीकेंड लॉकडाऊन दरम्यान APMC मार्केट सुरू राहणार का?
होय. कोविड संदर्भातील सर्व नियमांचे पालन करुन सुरू राहणार. नियमांचे उल्लंघन केल्यास बाजार बंद करण्यात येणार.
बांधकामासाठी आवश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहणार?
नाही.
नागरिक दारू खरेदी करू शकतात का?
होय. नागरिक हे 4 एप्रिल रोजी उपहारगृहे आणि बार यांच्यासाठी काढलेल्या आदेशाप्रमाणे निर्धारित वेळेत बारमधून टेक अवे पद्धतीने किंवा होम डिलिव्हरीने मद्य खरेदी करु शकतात.
दारूची दुकाने सुरू राहणार? होम डिलिव्हरी मिळेल?
नाही
वाहनांची दुरुस्ती करणारे गॅरेजेस, ऑटोमोबाइल दुकाने सुरू राहणार का?
वाहतूक सुरू असल्याने दुरुस्ती करणारी गॅरेजेस सुरू राहू शकतील. मात्र, त्यांनी कोविड विषयक आरोग्याच्या नियमांचे पालन करायला हवे. याच्याशी संबंधित दुकाने मात्र, बंद राहतील. कोविड नियम न पाळणारी गॅरेजेस कोविड संसर्ग असेपर्यंत बंद ठेवण्यात येतील.
हे पण वाचा: Maharashtra Lockdown Rules Revised : काय सुरू आणि काय बंद? सरकारने जारी केले नवे नियम
रस्त्याशेजारी ढाबा?
होय. ढाबा सुरू असणार मात्र, तेथे बसून नागरिकांना खाता येणार नाही तर घरी पार्सल नेता येईल.
इलेक्ट्रिकल वस्तूंची दुकाने
बंद राहणार.
राज्य शासनाच्या नव्या नियमावलीनुसार
आपले सरकार सेवा केंद्र, सेतू केंद्र, पासपोर्स सेवा वीकडेजमध्ये सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहू शकतात.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य शासनाने ब्रेक द चेन घोषित करुन कठोर निर्बंध लावले आहेत. यामध्ये कोरोना लस न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच त्याची वैधता पंधरा दिवस ठरवण्यात आली आहे. आता यात सुधारणा करण्यात आली असून दिनांक 10 एप्रिलपासून आरटीपीसीआर चाचणीला पर्याय म्हणून रॅपिड टेस्ट चाचणी ग्राह्य धरण्यात येईल.
यामध्ये सार्वजनिक वाहतूक, खाजगी वाहतू, चित्रपट, जाहिरात आणि चित्रवाणी मालिकांसाठी चित्रीकरण करणारे कर्मचारी, होम डिलिव्हरी सेवेतील कर्मचारी, परीक्षा कार्यातील सर्व कर्मचारी व अधिकारी, लग्न समारंभातील कर्मचारी, अंतिम संस्कार करणारे कर्मचारी, खाद्य विक्री करणारे लोक, इतर कर्मचारी, कारखान्यातील कामगार, ई-कॉमर्स मधील व्यक्ती, बांधकाम क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Liquor stock, Lockdown, Maharashtra