मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /महाराष्ट्रातून रेड आणि ग्रीन झोन होणार गायब, संध्याकाळी ठरणार लॉकडाऊन 5.0 मागचं भविष्य

महाराष्ट्रातून रेड आणि ग्रीन झोन होणार गायब, संध्याकाळी ठरणार लॉकडाऊन 5.0 मागचं भविष्य

आज सायंकाळपर्यंत लॉकडाऊन 5.0 विषयी मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र सरकारकडून जारी करण्यात येणार आहेत.

आज सायंकाळपर्यंत लॉकडाऊन 5.0 विषयी मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र सरकारकडून जारी करण्यात येणार आहेत.

आज सायंकाळपर्यंत लॉकडाऊन 5.0 विषयी मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र सरकारकडून जारी करण्यात येणार आहेत.

विनया देशपांडे, प्रतिनिधी

मुंबई, 31 मे : केंद्र सरकारने पाचव्या टप्प्यातील नियमावली जाहीर केल्यानंतर आज संध्याकाळपर्यंत राज्यातील लॉकडाऊनसंदर्भात महत्त्वाचे निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार असल्याचं सांगण्यात आहे. आज सायंकाळपर्यंत लॉकडाऊन 5.0 विषयी मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र सरकारकडून जारी करण्यात येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने दिलेल्या नियमांनुसार लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी महाराष्ट्र सरकार तयार नाहीये. कारण, राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता आधीसारखंच लॉकडाऊनचं पालन करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

कोरोनाने आजही गाठला सर्वाधिक रुग्णांचा आकडा, 24 तासांत 8 हजारांहून अधिक रुग्ण

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झोनसंदर्भातील कलर कोडिंग आता संपलं असल्यानं कंटेनमेंट आणि नॉन-कंटेनमेंट असे दोनच झोन असणार आहेत. रेड आणि ग्रीन झोन हा पॅटर्न या पुढे लागू होणार नाही. यादरम्यान, कंटेनमेंट झोनमध्ये कोणतीही शिथिलता देण्यात येणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. केंद्र सरकारने (Government) लॉकडाऊनचा (Lockdown) कालावधी 30 जूनपर्यंत वाढवला आहे. लॉकडाऊन 5.0 साठी सरकारने मार्गदर्शक सुचनादेखील जारी केल्या आहेत. हे लॉकडाउन तीन टप्प्यात विभागलं गेलं आहे आणि त्याला अनलॉक -1 (Unlock-1) असं नाव देण्यात आलं आहे. त्याचबरोबर टप्प्याटप्प्याने सरकारने कंटेनमेंट झोन वगळता सूट दिली आहे. या पहिल्या टप्प्यात अनेक अटी शिथिल करण्यात आल्या आहेत.

कोरोनापेक्षाही मोठं संकट, तब्बल 7 लाख दुकानं बंद होण्याच्या मार्गावर

8 जूननंतर कंटेनमेंट झोनशिवाय इतर ठिकाणी सर्व मंदिर, मॉल, शॉप्स खुले होतील. राज्य सरकारने स्थानिक परिस्थिती विचार लक्षात घेत शाळा कॉलेज याचा विचार करावा अथवा पुन्हा जून अखेर आढावा घेऊन जुलै महिन्यात सुरू करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. पण महाराष्ट्र सरकार याबाबत काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. काही छोटी दुकानं उघडण्याच्या दृष्टीने किंवा काही मैदानी शारीरिक क्रियाकलापांना परवानगी देण्याच्या बाबतीत राज्यात सूट मिळाणार नसल्याची शक्यता आहे. राज्यातील रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेत हे महत्त्वाचं आहे.

Mann ki baat Live : लढाई तितकीच गंभीर, आता अधिक काळजी आवश्यक

दरम्यान, महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा रुग्णांचा आकडा सर्वाधिक आहे. अशात केंद्राने दिलेल्या नियमांनुसार सूट दिली तर कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे राज्यात नॉन-कंटेनमेंट झोन वगळता लॉकडाऊनमध्ये कोणताही बदल होणार नसल्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अनेक राज्यांनी जिल्ह्यांच्या सीमा खुल्या केल्या आहेत. त्याबद्दलही राज्य सरकार काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी आज दुपारी 12.30 वाजता शालेय शिक्षणमंत्री आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेणार आहेत. त्यात शाळा, महाविद्यालये सुरू करण्याविषयी काही महत्त्वाच्या निर्णयांवर चर्चा होणार आहे.

Unlock-1: या नियमांसोबत मिळणार सूट, नजर टाकूयात काय सुरू होणार आणि काय बंद

संपादन - रेणुका धायबर

First published:

Tags: Corona