कल्याण डोंबिवलीमध्येही कडक लॉकडाऊन; भाज्या, फळं मिळणार का? काय राहणार बंद?

कल्याण डोंबिवलीमध्येही कडक लॉकडाऊन; भाज्या, फळं मिळणार का? काय राहणार बंद?

ठाण्याप्रमाणेच कल्याण डोंबिवली शहरांतही 19 तारखेपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. या वेळच्या लॉकडाऊनमध्ये काय आहेत निर्बंध? काय सुरू राहणार काय बंद?

  • Share this:

मुंबई, 10 जुलै : ठाण्यापाठोपाठ (Thane lockdown) कल्याण डोंबिवली महापालिकेनंही (KDMC Lockdown) चा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून Coronavirus चे रुग्ण वाढल्याने मुंबईजवळच्या या मोठ्या उपगनगरांमध्ये कडक लॉकडाऊन सुरू होता. आता यात वाढ (Lockdown extenstion) करण्यात आली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेने (KDMC) दिलेल्या आदेशानुसार आता 19 जुलैपर्यंत लॉकडाऊनचे कडक निर्बंध असतील. या काळात नागरितांना अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त घराबाहेर पडायची परवानगी नाही. तसंच दूध, औषधं आणि इतर आवश्यक सेवांची दुकानं वगळता अन्य दुकानं, व्यवहार बंद असतील, असंही सांगण्यात आलं आहे.

वाचा - महाराष्ट्रात नव्या रुग्णांची संख्या गेली 7000 वर; Coronavirus चे Latest अपडेट्स

गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. त्यामुळे या व्हायरसशी साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन गरजेचं असल्याचं मत व्यक्त होत आहे. त्यामुळे ठाण्यासह कल्याण, डोंबिवली महापालिकेनंही कडक लॉकडाऊन वाढवला आहे.

ठाणे महापालिकेनंही 19 तारखेपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांनी सोमवारपासून 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे.

वाचा - पुण्यात पुन्हा लॉकडाऊन! अजित पवारांच्या आदेशाला व्यापारी संघाचा विरोध

या दोन्ही शहरांमध्येही ठाण्याप्रमाणेच फक्त आवश्यक सेवा वगळता बाकीचे व्यवहार बंद असतील.

यावर बंदी

दुकानं (जीवनावश्यक सेवा देणारी वगळून)

रिक्षा, बस, टॅक्सी (अत्यावश्यक सेवेतल्या वगळून)

खासगी वाहनांना फक्त जीवनावश्यक सेवेसाठी परवानगी

5 पेक्षा अधिक व्यक्तींना एका ठिकाणी जमण्यास बंदी

खासगी प्रवासी वाहतूक

खासगी वाहनात ड्रायव्हरसह फक्त 2 लोकांना अनुमती

खासगी ऑफिस

व्यावसायिक आस्थापने

कारखाने, दुकानं (अत्यावश्यक सेवा आणि त्यांचे पुरवठादार वगळून)

सरकारी कार्यालयांत कमीत कमी उपस्थितीत कामाला परवानगी

अनावश्यक कारणांसाठी बाहेर पडणे

हे राहील सुरू

रुग्णालयं, औषध विक्री

जीवनावश्यक वस्तूंची दुकानं

पेट्रोल पंप (फक्त अत्यावश्यक सेवेतल्या वाहनांसाठी)

बँक, एटीएम इत्यादी

भाजी आणि किराणा वाहतूक करणाऱ्या गाड्या

मद्यविक्री (फक्त होम डिलिव्हरीची परवानगी)

प्रिंट, इलेक्ट्रॉनिक माध्यमं

घरपोच अन्नधान, भाजी इत्यादी पुरवणाऱ्या सेवा

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: July 10, 2020, 9:08 PM IST

ताज्या बातम्या