उद्धव ठाकरेंनी केली अत्यावश्यक लोकल सुरू करण्याची विनंती; मोदींबरोबरच्या बैठकीत नेमकं काय झालं?

उद्धव ठाकरेंनी केली अत्यावश्यक लोकल सुरू करण्याची विनंती; मोदींबरोबरच्या बैठकीत नेमकं काय झालं?

लॉकडाऊनच्याबाबत पंतप्रधानांनी निश्चित व ठोस अशी दिशा दाखवावी, आम्ही सर्व राज्यं त्याप्रमाणे अंमलबजावणी करू असंही मुख्यंत्री म्हणाले.

  • Share this:

मुंबई 11 मे : मुंबईत फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय सेवा सुरू करावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांबरोबरच्या बैठकीत केली. लॉकडाऊनच्याबाबत पंतप्रधानांनी निश्चित व ठोस अशी दिशा दाखवावी, आम्ही सर्व राज्यं त्याप्रमाणे अंमलबजावणी करू असंही मुख्यंत्री म्हणाले. पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर आज चर्चा केली. 17 मेनंतर काय याविषयी या वेळी चर्चा झाली.

महाराष्ट्र सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याची विनंती पंतप्रधानांना केली आहे. "लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करतांना आपण ग्रीन झोन्समध्ये उद्योग-व्यवसाय सुरु होतील असे पाहिले आहे. परप्रांतीय मजुरांची वाहतूक सुरू झाली आहे. मात्र हे करतांना प्रत्येक राज्याने व्यवस्थित काळजी आवश्यक आहे अन्यथा कोरोना संसर्ग देशभर वाढू शकतो", असंही मुख्यमंत्री म्हणाले. "महाराष्ट्राने 5.5 लाख मजुरांच्या निवारा व नाश्ता, भोजनाची व्यवस्था केली तसंच इतर राज्यांशी समन्वय ठेऊन मजुरांना पाठवणं सुरू केलं आहे", असं मुख्यमंत्री म्हणाले.

पुढचा काळ धोक्याचा

'आपण एप्रिल मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला. आता असं सांगण्यात येतं की, मेमध्ये या रोगाचा उच्चांक येईल, तो जून , जुलैमध्येही येऊ शकतो, असंही बोललं जाते. वुहानमध्ये परत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे, असं मी वाचलं. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा इशारा दिला आहे. अशा वेळी लॉकडाऊन बाबत काळजीपूर्वक कार्यवाही व्हावी', असं उद्धव म्हणाले.

रशियात 24 तासांत कोरोना रुग्णांमध्ये धक्कादायक वाढ; ब्रिटन, इटलीलाही टाकलं मागे

मुंबईमध्येही उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करावी मात्र फक्त अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठीच ती असावी व केवळ ओळखपत्र पाहून प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली.

पिक कर्ज मिळावे

महाराष्ट्रात कोरोना पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना सुरु होती. मात्रे काही जिल्ह्यांमध्ये विशेषत: विदर्भात निवडणुकांमुळे तेथील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही. आता खरीप हंगाम सुरु झाला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही त्यांना पिक कर्ज मिळावे म्हणून रिझर्व्ह बँकेला केंद्रामार्फत सुचना द्याव्यात, सुमारे 10 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

जीएसटी परतावा लवकर मिळावा

राज्याला 35 हजार कोटींचा फटका बसला असून जीएसटी परताव्यापोटी तसेच केंद्रीय कराच्या हिशापोटी संपूर्ण रक्कम लवकरात लवकर मिळावी म्हणजे या संकट समयी मदत होऊ शकेल असेही मुख्यमंत्री म्हणाले. कंटेनमेंट क्षेत्राकडे अधिक काटेकोर लक्ष देण्यात येत असून लॉकडाऊनची अधिक कठोर अंमलबजावणी. चाचण्यांची संख्याही खूप वाढवली आहे.

महाराष्ट्रातील हे गाव आता 'हिरोची वाडी', इरफानच्या प्रेमाखातर गावकऱ्यांचा निर्णय

नेहरू सायन्स सेंटर, रेसकोर्स मैदान, वांद्रा-कुर्ला संकुल, गोरेगाव एक्झिबिशन सेंटर येथे विलगीकरणाची, उपचाराची व्यवस्था केल्याचेही ते म्हणाले. या कोरोनाचा प्रतिबंध करणारे औषध बनविणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन देऊन ते तयार करण्यात पुढाकार घेतल्यास उपयोग होईल असेही ते म्हणाले. वैद्यकीय उपकरणांवरील जीएसती शुल्क माफ करावे तसेच काही संस्था उपकरणे आयात करीत आहेत सीमा शुल्कात सवलत द्यावी असेही ते म्हणाले. मुंबई पुणे सारखा तज्ञ डॉक्टर्सचा तस्क फोर्स देशाच्या पातळीवर तयार करून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे तो संपर्कात राहील असे पाहण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.

कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने हादरलं केंद्र सरकार, तयार होतोय नवा Action Plan

First published: May 11, 2020, 7:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading