LIVE NOW

LIVE: वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडून मंजूर, राज्यपालांकडे पाठवला

कोरोनासह राज्य आणि देशभरातील महत्त्वांच्या घडामोडींचे लेटेस्ट अपडेट

Lokmat.news18.com | March 4, 2021, 8:43 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated March 4, 2021
auto-refresh

Highlights

8:43 pm (IST)

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांचं 'मिशन मॉल', मॉलमधली गर्दी टाळण्यासाठी आता महापौर विविध मॉल्सना भेटी देणार, रेल्वेनंतर महापौर करणार मॉलमध्ये जनजागृती, पबमधली गर्दी टाळण्यासाठी महापौरांचा कठोर कारवाईचा इशारा, महापौर किशोरी पेडणेकरांची 'न्यूज18 लोकमत'ला एक्सक्लुझिव्ह माहिती, पब मालकांवर MRTP ची कारवाई करा, गर्दी करणाऱ्यांवर कलम 188 ची कारवाई करा, महापौर किशोरी पेडणेकरांचे प्रशासनाला आदेश

8:30 pm (IST)

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत सातत्यानं वाढ
राज्यात दिवसभरात 8,998 नवीन रुग्ण
राज्यात दिवसभरात 60 रुग्णांचा मृत्यू

8:07 pm (IST)

नागपूर वेधशाळेचा विदर्भातील चंद्रपूर, वाशिम, अकोला या 3 जिल्ह्यांसाठी हाय अलर्ट, सध्या विदर्भाचं तापमान सामान्यापेक्षा 4 ते 6 अंश से. अधिक

8:04 pm (IST)

अंबरनाथ - शिवमंदिर महाशिवरात्रीनिमित्त भाविकांना दर्शनासाठी बंद, महाशिवरात्रीला भरणारी जत्रादेखील यावर्षी भरणार नाही, अंबरनाथ शिवमंदिर मंदिर पूजाऱ्यांचा निर्णय

7:00 pm (IST)

गणेश मंडळांनी तन्मयतेनं समाजकार्य सुरू ठेवल्यास यंदा गणेशोत्सव निर्विघ्नपणे करता येईल -राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

6:52 pm (IST)

अहमदनगर - रेखा जरे हत्याकांड प्रकरण
आरोपी बोठे अखेर फरार घोषित
पोलिसांनी पारनेर कोर्टात केला होता अर्ज

6:51 pm (IST)

अहमदनगर - रेखा जरे हत्याकांड प्रकरण
आरोपी बोठे अखेर फरार घोषित
पोलिसांनी पारनेर कोर्टात केला होता अर्ज

6:28 pm (IST)

विकासकांना मालमत्ता अधिमूल्यात 50 टक्के सूट, महापालिकेच्या भूखंडावर विकसित करण्यात येणाऱ्या इमारतींसाठी मुंबई महापालिकेचा विकासकांना दिलासा देणारा मोठा निर्णय

6:11 pm (IST)

कोल्हापूर-कर्नाटकमधील बससेवा पुन्हा सुरू, तब्बल 9 दिवसांनंतर कर्नाटकातील एसटीची बससेवा, कोरोनामुळे बससेवा केली होती बंद, RT-PCR टेस्ट केली होती बंधनकारक, कोल्हापूरमधून निपाणी-बेळगाव-धारवाड-हुबळी-बंगळुरूला बसेस रवाना, 9 दिवसांमध्ये महाराष्ट्र एसटी प्रशासनाचं मोठं नुकसान

6:04 pm (IST)

अकोला जिल्ह्यातील हॉटस्पॉट झोनमधील लॉकडाऊनमध्ये शिथिलता, सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत सुरू राहणार सर्व दुकानं

Load More
कोरोनासह राज्य आणि देशभरातील महत्त्वांच्या घडामोडींचे लेटेस्ट अपडेट